Mon, Jul 22, 2019 03:17होमपेज › Belgaon › पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा खोटारडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा खोटारडे

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 8:56PMचिकोडी : प्रतिनिधी

विदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकांच्या खात्यावर 15 लाख जमा करणार म्हटले. त्यातील 15 पैसे तरी जमा केले का, असा सवाल करत पंतप्रधान मोदी व अमित शहा हे असत्याचे सम्राट असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.येथील  आर. डी. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित काँग्रेस उमेदवार गणेश हुक्केरींच्या प्रचार सभेत ते बोलत होते.ते पुढे म्हणाले,  देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रक्त सांडले, बलिदान दिले. आरएसएस किंवा भाजपाच्या  नेत्यांनी देशासाठी प्राणत्याग केला का ? पाच वर्षात 3 मुख्यमंत्री भाजपाचे झाले पण एकच मुख्यमंत्री पाच वर्षे राज्य चालविल्याचा इतिहास काँग्रेसने राज्यात घडविला आहे. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे म्हणतात, आम्ही निवडणून आल्यानंतर राज्यघटना बदलणार तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे माझ्यासाखा एक गरीब व्यक्ती देशाचा पंतप्रधान बनल्याचे मोदी म्हणतात. त्यामुळे मोदींनी आरएसएसला की राज्यघटनेला ते सांगावे, असा सवाल त्यांनी केला.

शेतकर्‍यांबद्दल मोदींचे प्रेम ढोंगी 

मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी राज्यातील शेतकर्‍यांचे 8700 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. पण मोदींनी पैसे छापण्याचे आपल्याकडे मशीन आहे का, असा सवाल करत हात झटकले. पण दुसरीकडे मोदींनी शेतकर्‍यांबदल काळजी असल्याचे खोटे सांगत आहेत. केवळ भाजपा सरकार असलेल्या राज्यांना मात्र कर्जमाफीसह पॅकेज देऊन कर्नाटकावर दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला.राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलामनबी आझाद म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसर्‍या ग्रहावरुन आले आहेत. कारण ते  भारतीय संस्कृतीच्या उलट  पंतप्रधानांचे बोलणे, स्वभाव, भाषणाची पध्दत, वर्तणूक व इतर धर्मांबदल व्यवहार आहेत. प्रत्येक व्यक्तीला जात धर्माच्या नावाने विभागले जात आहे. लोकसभेत अनेकदा दलित, शेतकरीसह अनेक प्रश्‍न विचारले असता नेहमी गप्प बसणारे मोदी केवऴ निवडणूक काळात आश्‍वासने देतात. 

आपल्याला मराठी कळते पण व्यवस्थित बोलता येत नाही. आपण वाशिममधून दोनदा लोकसभा व राज्यसभेवर निवडून गेल्याने मराठी लोकांचा संपर्क आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी, आ. गणेश हुक्केरी, माजी आ. वीरकुमार पाटील, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह हजारो संख्येने कार्यकर्ते  उपस्थित होते.