Wed, Jul 17, 2019 00:10होमपेज › Belgaon › चेंबर निवडणुकीत प्रस्थापितांची बाजी

चेंबर निवडणुकीत प्रस्थापितांची बाजी

Published On: Jul 26 2018 1:31AM | Last Updated: Jul 26 2018 12:25AMबेळगाव : प्रतिनिधी

चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापन समितीवर प्रस्थापितांनी बाजी मारली आहे. महेश बागी,  संजय कत्तीशेट्टी यांच्यासह दिलीप चिंडक या दिग्गजांची निवड झाली आहे. 
तथापि, मतदानात उत्साह दिसून आला नाही.  केवळ 42 टक्के मतदान झाले. एकूण 1910 मतदारांपैकी 809 जणांनीच मतदानाचा हक्क बजावला.  बुधवारी रात्री 7.30 वाजता निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. 

व्यापारी विभागात 1190 मतदारांपैकी 429 जणांनी मतदान केले. या विभागात 5 जागांसाठी 8 जण रिंगणात होते. त्यापैकी पंचाक्षरी चोन्नद (332 मते), किरण अगडी (274), महेश बागी (237), स्वप्नील शहा (228) आणि संजय कत्तीशेट्टी (227) विजयी झाले. निवडणूक अधिकारी  म्हणून अ‍ॅड. उमेश बिडीकर यांनी काम पाहिले.

औद्योगिक विभागातून 3 जागांसाठी 8 जण रिंगणात होते. 720 मतदारांपैकी 380 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. दिलीप चिंडक (204), कीथ मचाडो (197), विलास बदामी (162)  विजयी झाले.  निवडणूक अधिकारी  म्हणून अ‍ॅड. भैरु टक्केकर यांनी काम पाहिले. 

बुधवारी सकाळी 10 ते दुुपारी 3 या वेळेत उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात मतदान पार  पडले.  सुरुवातीला 25 जणांनी अर्ज दाखल केला होता. गुरुवार दि. 19 रोजी 9 जणांनी माघार घेतली. 

व्यापारी विभागातील एक जागेवर बिनविरोध निवड झाली आहे. एक जागा खुली असली तरी या पदासाठी एकही अर्ज नसल्याने ही जागा रिक्त राहिली आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांना समर्थकांनी पुष्पहार घालून जल्लोष केला.