Tue, Jul 16, 2019 10:00होमपेज › Belgaon › बदलासाठी जनतेची मानसिकता तयार 

बदलासाठी जनतेची मानसिकता तयार 

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 12:20AMखानापूर : प्रतिनिधी

विकासाच्या भूलथापांनी जनतेला भूलविण्याचा प्रयत्न करणार्‍यांचे दिवस संपत आले आहेत. खर्‍या-खोट्याची पारख करण्याची क्षमता जनतेमध्ये जागी होत असून विकासाचे सोबती होण्यासाठी सर्वसामान्यांचे डोळे आसुसलेले आहेत. भौतिक आणि मानसिक बदलासाठी जनतेने मनाशी ठाम निर्धार केला असून काँग्रेस हाच विकासाच्यादृष्टीने सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत खानापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी व्यक्त केले.

पूर्व भागातील तरुण व ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या विजयासाठी घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. निंबाळकर बोलत होत्या.
तालुक्याच्या पूर्व भागातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्ते जात, पात, भाषा आणि धर्मभेद बाजूला सारुन ऐक्याचा नारा देत काँग्रेसच्या विजयासाठी कटिबद्ध झाले आहेत. सर्व थरातील पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन मार्गी लावण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे.डॉ. निंबाळकर आणि ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक अंगडी यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील पारिश्‍वाड आणि कक्केरी या जि. पं विभागातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या.

सर्वच गावातील कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करुन विकासासाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याची ग्वाही दिली. बुथ कमिट्यांच्या सदस्यांना जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या.अध्यक्ष अ‍ॅड. अशोक अंगडी, प्रचार समितीचे प्रमुख अ‍ॅड. एन. आय. कोडोळी, मडिवाळप्पा गौडर पाटील, गौसलाल पटेल, मारुती अळवणी, रुद्रान्ना तुरमुरी, जगदिशगौडा पाटील, शफी खाजी, शिराज बिडीकर, महावीर पाटील, बशीर अहमद, नागाप्पा आदींनी दौर्‍यात सहभाग घेऊन काँग्रेसचा सर्वसमावेशक विकासाचा विचार जनमाणसांत रुजविण्याचा प्रयत्न केला.

Tags : Belgaum, Prepare,  mindset, people,  change