Wed, Nov 14, 2018 03:45होमपेज › Belgaon › गर्भवती,अर्भक मृत्यू रोखण्याचे प्रयत्न

गर्भवती,अर्भक मृत्यू रोखण्याचे प्रयत्न

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

गर्भवती माता व नवजात बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होण्यासाठी केंद्र सरकार विविध पातळीवर सातत्याने प्रयत्न करत यासंदर्भात असून संशोधनही करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी येथे केले.

येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजतर्फे ‘प्रसूती व नवजात बालकांचे आरोग्य’ या विषयावर दुसर्‍या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन केल्यानंतर डॉ. हर्षवर्धन बोलत होते.

केएलईचे कार्याध्यक्ष खा. डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह डॉ. चंद्रशेखर, डॉ. ए. लक्ष्मय्या, डॉ. मार्क एल. तायकोसिंकी, डॉ. जोशू वोगेल,  डॉ. तोन्से एन. के. राजू, मेरी इलेन संतान, डॉ. नवीन राव, डॉ. विवेक सावोजी उपस्थित होते.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, की केएलई संस्थेने आजपर्यंत अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने उपचाराच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या कार्यात केएलई संस्था अग्रेसर आहे.
खा. डॉ. कोरे म्हणाले, या आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषदेमुळे येथील नामवंत डॉक्टरांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. या ठिकाणी विविध देशांतून तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. वैद्यकीय संशोधनांची देवाणघेवाण होणार आहे. याचा उपयोग भविष्यात येथील वैद्यकीय सोयीसुविधांसाठी होईल.

जेएनएमसीच्या प्राचार्या डॉ. निरंजना महांतशेट्टी म्हणाल्या, आमच्या महाविद्यालयात प्रसूतमाता व नवजात बालकांचे आरोग्य या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. वेगाने बदलत जाणार्‍या वैद्यकीय बदलाचा अभ्यास करण्यास मदत होईल.
विविध देशांतील वैद्यकीय संशोधनातील प्रबंधांवर यावेळी चर्चा करण्यात आली.


  •