Mon, Nov 19, 2018 04:19होमपेज › Belgaon › प्रदीपकुमार माळगी यांचा काँग्रेसकडून अर्ज दाखल 

प्रदीपकुमार माळगी यांचा काँग्रेसकडून अर्ज दाखल 

Published On: Apr 21 2018 12:59AM | Last Updated: Apr 21 2018 12:05AMरायबाग : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते डी. टी. पाटील, सुभाषगौडा पाटील, वसंतराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव पाटील, जि. पं. सदस्य प्रणयअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रदीपकुमार माळगी यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठ्या संख्येने आलेल्या समर्थकांसह माळगी यांनी रायबाग तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केला.   निवडणूक अधिकारी अमरेश नाईक यांनी अर्ज स्वीकारला. यानंतर पत्रकारांशी बोलताना माळगी म्हणाले, मतदार संघातील सर्व भागातून पाठिंबा मिळत असल्याने आपला विजय निश्‍चित असून मतदारांना विकासकामातून पोच पावती देऊ.

Tags : Belgaum, Pradeepkumar Malgi, filed, nomination,  Congress