Thu, Apr 25, 2019 16:20होमपेज › Belgaon › जीएसटीमुळे आर्थिक स्थितीत सुधारणा : खा. डॉ. कोरे

जीएसटीमुळे आर्थिक स्थितीत सुधारणा : खा. डॉ. कोरे

Published On: Jul 02 2018 1:42AM | Last Updated: Jul 02 2018 12:36AMबेळगाव : प्रतिनिधी

जीएसटीबद्दल गैरसमज पसरवला जात आहे. ‘एक कर एक देश’ अशी कररचना आहे. एकच कर लावण्यात आल्याने देशाची आर्थिक स्थिती सुधारली आहे. देशांचे लाखो कोटींचे कर्ज फेड करण्यास ही पद्धत उपयुक्त ठरत आहे. देशाला लाभदायक अशी ही पद्धत आहे, असे प्रतिपादन खा. डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. 

बेळगाव येथील जीएसटी वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयातर्फे  जीएसटीच्या वर्षपूर्तीसंबंधी हॉटेल संकम येथे कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. खा. सुरेश अंगडी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.  

खा.  अंगडी म्हणाले, जीएसटीमुळे देशाच्या खजिन्यात आर्थिक भर पडत असून भरभराट होत आहे. व्यापारात वद्धी झाली असून देशाचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे सरकाला देशातील लोकांना सोयी-सवलती  देता येत आहेत. सर्वसामान्य लोकांनादेखील जीएसटीचा लाभ झाला आहे. 

जीएसटी आयुक्त बिजॉयकुमार यांनी बेळगाव विभागात जमा झालेल्या जीएसटीबद्दल माहिती दिली. तसेच वसुलीसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकार्‍यांचा सत्कार केला.
याप्रंसगी जीएसटीचे सहआयुक्त एस. के. महतो,  ग्रामीण विभाग सहायक आयुक्त ए.के. सासमल, प्रताप घग, जी. रामनाथ आदी अधिकारी उपस्थित होते.