Fri, Jul 19, 2019 05:07होमपेज › Belgaon › खानापूर न.पं., निपाणी-चिकोडी न.पा.साठी 29 ऑगस्ट रोजी मतदान

खानापूर न.पं., निपाणी-चिकोडी न.पा.साठी 29 ऑगस्ट रोजी मतदान

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 03 2018 12:23AMबंगळूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता मतदारांना आणखी एका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यातील 105 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पहिल्या टप्प्यात  29 ऑगस्टरोजी मतदान होणार आहे. त्यामध्ये खानापूर नगरपंचायत, निपाणी नगरपालिका, चिकोडी नगरपालिका, संकेश्‍वर नगरपालिकेचा समावेश आहे. या निवडणुकीची आचारसंहिता गुरुवार, 2 ऑगस्टपासूनच लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्‍त पी. एन. श्रीनिवासाचारी यांनी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले.  त्यानुसार पहिल्या टप्प्यात 29 नगरपालिका, 53 नगर परिषदा, 23 नगर पंचायतींसाठी मतदान होईल. याकरिता 25 आयएएस अधिकार्‍यांची निरीक्षक म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे. 

बंगळूर शहर, बंगळूर ग्रामीण, रामनगर, कोलार, चिक्‍कबळ्ळापूर, धारवाड आणि चिक्‍कमगळूर या जिल्ह्यांना वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. तसेच लवकरच मुदत संपणार्‍या शिमोगा, म्हैसूर, तुमकूर महानगरपालिकेची निवडणूक घोषणा अजून झालेली नाही. या निवडणुकीत मतदानयंत्रांचा वापर केला जाणार आहे. यंदा प्रथमच मतदारांना नोटाचा पर्याय असेल. आपल्या पसंतीचा उमेदवार रिंगणात नसेल किंवा कोणत्याही उमेदवाराला मतदान करावयाचे नसेल तर नोटाचे बटण दाबता येणार आहे. निवडणूक आयोगाचया वेबसाईटवर आरक्षण प्रसिद्ध करण्यात आले आहे.

बेळगावात कुठे?

बेळगाव जिल्ह्यात निपाणी , चिकोडी, गोकाक नगरपालिका, रामदुर्ग, बैलहोंगल, संकेश्‍वर, सौंदत्ती, मुडलगी, सौंदत्ती, मुडलगी, कुडची, हुक्केरी, सदलगा, कोन्नूर नगर परिषदा आणि रायबाग, खानापूर नगर पंचायतीत निवडणूक होणार आहे.