होमपेज › Belgaon › पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांवर शिक्‍कामोर्तब

पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांवर शिक्‍कामोर्तब

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 8:50PMनिपाणी : प्रतिनिधी

आगामी होणार्‍या  विधानसभा निवडणुकीआधी आयजीपी आलोककुमार   यांनी कौंसेेलिंगव्दारे पोलिस उपनिरीक्षकपदाच्या अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश 25 जानेवारी रोजी दिले होते. मात्र तो आदेश प्रलंबित राहिला होता. आता त्या आदेशाला मंजुरी मिळाली असून कौंसेेलिंगव्दारेे तयारी झालेली अंतिम यादीच कायम करण्यात आली आहे. ‘पुढारी’ने शनिवार 17 च्या अंकात बदली यादी लटकल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर रविवारी जिल्हा प्रशासनाने जुनीच यादी कायम केल्याने आता गदग, विजापूर, बागलकोट, धारवाड, बेळगाव या पाच जिल्ह्यांत कौंसेेलिंगव्दारे नियुक्‍त झालेले 115 नवे पोलिस अधिकारी रूजू होणार आहेत.

यात निपाणी सर्कलअंतर्गत येणार्‍या  शहर, बसवेश्‍वर चौक तसेच खडकलाट या तिन्ही पोलिस स्थानकात नवीन उपनिरीक्षक रुजू होणार आहेत.निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार निवडणूक काळापुरते नवीन अधिकारी येतील. बदली झालेल्यांमध्ये निपाणी शहर स्थानकाच्या उपनिरीक्षकपदी सध्या  बागलकोट जिल्हा पोलिस मुख्यालयात सेवेत असलेले अशोक चव्हाण यांची, तर बसवेश्‍वर चौक स्थानकाच्या उपनिरीक्षकपदी गोकाक येथील रामगौंडा जानर नियुक्ती होईल. तर खडकलाट पोलिस स्थानकासाठी विजापूर येथील  .बी.बागेवाडी यांची नव्याने नियुक्ती झाली आहे.

 सध्या खडकलाट स्थानकात सेवेत असलेले बसगौडा पाटील यांची विजापूर येथील आदर्श नगर पो.स्थानकात तर बसवेश्‍वर चौक स्थानकाच्या  रोहिणी पाटील यांच्यासह शहर स्थानकातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या फौजदार शिवलिला खानापुरे यांची बेळगाव जिल्हा पोलिस मुख्यालयात बदली झाली आहे. बसवेश्‍वर चौक स्थानकातील  गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक बी.वाय बेटगेरी यांना  याच स्थानकात सेवा बजावण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.संकेश्‍वर पोलिस स्थानकाचे  एच.डी.मुल्ला यांची ऐगळी स्थानकात बदली झाली असुन त्यांच्या जागी शिवकुमार मुचंडी यांची नियुक्ती झाली आहे.एकूणच या सर्व बदल्या केवळ चार महिन्याच्या कालावधीसाठी  असल्या तरी निवडणूक काळात त्यांचा कस लागणार आहे.