Fri, Nov 16, 2018 02:27होमपेज › Belgaon › परागंदा समाजकंटकांच्या शोधात पोलिसांची मोहीम

परागंदा समाजकंटकांच्या शोधात पोलिसांची मोहीम

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 12:29AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

बुधवारीही खडक गल्ली आणि संवेदनशील भागात तणावपूर्ण शांतता होती. सायंकाळी विविध ठिकाणी रस्त्यावरील बॅरिकेड्समुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण होते. सोमवारी रात्री झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी मंगळवारी पहाटेपर्यंत अटकसत्र सुरू ठेवले होते. मार्केट पोलिसांनी 23, तर खडेबाजार पोलिसांनी 4 समाजकंटकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर अन्य 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. 

सायंकाळी जालगार गल्ली, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, खडक गल्ली भागांतील रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे खळबळ उडाली. पोलिस नवी कोणती कारवाई करणार का, अशी भीती पसरली. 

दरम्यान, अन्य काही समाजकंटकांची माहिती मिळाली आहे; मात्र समाजकंटक शहर सोडून पळून गेले आहे. त्यामुळे परागंदा झालेल्या समाजकंटकांच्या शोधाचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस काही समाजकंटक आपल्या घरी परङतील, या संशयातून पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा समाजकंटकांच्या अटकेसाठी हालचाली चालविल्या होत्या. साध्या वेशातील पोलिस संवेदनशील भागात तैनात करण्यात आले आहेत.