Fri, Apr 26, 2019 19:21होमपेज › Belgaon › जुगारी बेळगाव, कंग्राळी, मच्छेसह सौंदत्ती, धारवाडचेही

जुगारी बेळगाव, कंग्राळी, मच्छेसह सौंदत्ती, धारवाडचेही

Published On: Aug 24 2018 12:41AM | Last Updated: Aug 23 2018 11:49PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव पोलिसांनी कुद्रेमानीजवळील जुगार अड्ड्यावर छापा टाकून 40 जुगार्‍यांना अटक  केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बैलहोंगल, सौंदत्ती, धारवाड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील चंदगड आणि बेळगाव तालुक्यातील जुगार्‍यांचा समावेश आहे.  सदर जुगार अड्डा धारवाड जिल्ह्यातील जुगार्‍यांनाही परिचित असल्याचे या धाडीतून समोर आले आहे. उपायुक्त सीमा लाटकर यांच्या नेतृत्वामध्ये  दि. 22 रोजी सायं. 5.30 वा. टाकण्यात आलेल्या छाप्यात 40 जुगार्‍यांना अटक करण्यात आली आहे. 30 पेक्षा अधिक जुगारी यावेळी पसार झाले आहेत.  

तुकाराम यल्लाप्पा कांबळे (वय 38, रा. बिजगर्णी), अमित विजय यादव (वय 27, रा. चंदगड), मोहन महादेव करपे (वय 44, रा. चंदगड), मनोहर ओमाण्णा मंडोळकर (वय 35, रा. मण्णूर), गणपती तातोबा कडोलकर (वय 61, रा. कंग्राळी बी. के.), महेश लक्ष्मण आनंदाचे (वय 43, रा. टी. व्ही. सेंटर), महादेव गुंडू पवार (वय 46, रा. जुने बेळगाव), विजय गजानन खटावकर (वय 64, रा. उचगाव), चंद्रशेखर राजाप्पा शेलार (वय 38, रा. वडगाव), शिवानंद शिवाप्पा पाटील (वय 65, रा. धारवाड), सचिन रामू गोंगले (वय 31, रा. मच्छे), उज्जेश उमेश नागठाण (वय 42, रा. एपीएमसी क्वॉर्टर्स), आनंद बाबू बेळगावकर (वय 38, रा. मच्छे), यल्लाप्पा रामचंद्र बेळगावी (वय 38, रा. चंदनहोसूर), राजू कल्लाप्पा करबण्णावर (वय 49, रा. चंदनहोसूर), भावकू बाबू कांबळे (वय 59, रा. देवरवाडी), महेश बन्नाप्पा सोमण्णावर (वय 36, रा. इंचल, ता. बैलहोंगल), नवीन अण्णाप्पा असोदे (वय 28, रा. सह्याद्रीनगर), महादेव शिवाप्पा बुडके (वय 56, रा. बेळगाव), लक्ष्मण मारुती पाटील (वय 56, रा. खादरवाडी), गजानन शशिकांत गावडे (वय 42, रा. हिंडलगा), आनंद परशुराम कावळे (वय 49, रा. उद्यमबाग), शिवकुमार अशोक पायण्णावर (वय 40, रा. रविवार पेठ), फकिर मल्लाप्पा कुडचीकर (वय 32, रा. सुळगा), किरण शिवाजी बाचोळकर (वय 35, रा. शहापूर), परशुराम शंकर सुनदाळ (वय 41, रा. उद्यमबाग), चंद्र बाळू हावेरी (वय 60, रा. मुनवळ्ळी, ता. सौंदत्ती), फकिरप्पा बसवाणी किल्लारी (वय 53, रा. सुनदाळ), पृथ्वीराज प्रभाकर देसाई (वय 40, रा. देवरवाडी), राजू सिद्धाप्पा कुरबगट्टी (वय 40, रा. धारवाड), विजय श्रीनिवास नाईक (वय 46, रा. शहापूर), सुरेश लक्ष्मण मोहिते (वय 71, रा. शिवाजी गार्डन), अशोक कनच्ची गायरी (वय 23, रा. हिंडलगा), बाळू नागाप्पा रवळू (वय 53, रा. वडगाव), मधू परशुराम जुवरकर (वय 58, रा. ताशिलदार गल्ली), सत्याप्पा लगमाप्पा बुड्र्यानूर (वय 60, रा. कंग्राळी बी. के.), विनायक चंद्रकांत जाधव (वय 29, रा. कामत गल्ली), संदीप शिवाजी पाटील (वय 38, रा. शिनोळी), अभिजित महादेव परीट (वय 23, रा. चंदगड), गोविंद रंगाप्पा मळली (वय 60, रा. होन्नाळ) अशी त्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्यांची गुरूवारी जिल्हा इस्पितळात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना सायंकाळी जामीन मंजूर करण्यात आला.

जुगार अड्ड्याचा होऊ देऊ नका ‘खो-खो’

बेळगाव : प्रतिनिधी

शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथे गत 50 वर्षांपासून सुरू असलेल्या मटका, जुगार अड्ड्यांमुळे बेळगावची  तरुणाई बरबाद होत आहे. अनेक तरुणांचे संसार धुळीस मिळत आहेत. याबाबत दै. पुढारीतून सर्वप्रथम 1 जूनच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. बेळगाव पोलिसांनी या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवूनच मंगळवार दि. 22 रोजी स्थलांतरित कुद्रेमानी  अड्ड्यावर धाड टाकून जुगारांच्या मुसक्या आवळल्या. 

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर बेळगावपासून केवळ 17 कि.मी. वर असणार्‍या शिनोळी खुर्द येथे मटका, जुगार अड्डा अन् यातून निर्माण झालेली गुन्हेगारी यामुळे हा मुद्दा मुंबईपर्यंत गाजला. त्यामुळे 28 मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकून हा अड्डा बंद केला. स्थानिक चंदगड पोलिस निरीक्षक, पाटणे फाटा पोलिस चौकीचे उपनिरीक्षक यांच्यासह अन्य कॉन्टेबलच्या तडकाफडकी बदल्या केल्या. यानंतर जुगार्‍यांनी या अड्ड्याला पर्याय म्हणून दोन कि.मी. अंतरावरील कुद्रेमानी (ता.बेळगाव) येथे पुन्हा मटका अड्डा सुरू केला. याची दखल बेळगाव पोलिसांनी घेन कारवाई केली. 

शिनोळी अड्ड्यावर कारवाई झाली की तात्पुरता बंद होत होता. पुन्हा येरे माझ्या मागल्या, असा प्रकार सुरु होता. गेल्या दोन, तीन महिन्यापासून हा अड्डा कुद्रेमानीत स्थलांतर झाला. हा परिसर डोंगराळ असल्याने कर्नाटकातील एजंट याचा गैरफायदा घेऊन पळून जात होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी हे ठिकाण एजंटांच्या दृष्टीने सोयीचे होते. शिनोळीतील 28 मे रोजी पडलेली धाड 50 वर्षातील सर्वात मोठी कारवाई होती.  

महाराष्ट्र पोलिस व कर्नाटक पोलिस हे संयुक्तपणे क्राईम बॉर्डर बैठक घेतात. पण, या बैठकीचे फलित काय? असा सवाल जनतेतून उपलब्ध केला जात आहे.  सीमाभागात महाराष्ट्र व  कर्नाटकातील संशयित आरोपींकडून वारंवार चोर्‍या घडत आहेत. याबाबत संयुक्त तपासासाठी एखादी तरी बैठक झाली का, हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे. जुगार अड्ड्याची समस्याही अशीच आहे. या ठिकाणी बेळगाव शहर, बैलहोंगल, रामदुर्ग, गोवा, हुबळी, सांगली, निपाणी येथील जुगार्‍यांची वर्दळ आहे. अड्डा चालकही परगावचेच आहेत. 

या अड्ड्याचे समूळ उच्चाटन होण्यासाठी बेळगाव व चंदगड पोलिसांनी दक्ष राहण्याची गरज आहे. शिनोळीत गेल्या 50 वर्षांत कित्येक धाडी पडल्या. मात्र काही काळ खंड पडता अड्डा सुरुच होतो. हा अड्डा पुन्हा दुसर्‍या ठिकाणी सुरु होऊ नये, यासाठी पोलिसांची खरी कसोटी आहे.