होमपेज › Belgaon › माजी उपमुख्यमंत्र्यांवर भूखंड घोटाळ्यात गुन्हा

माजी उपमुख्यमंत्र्यांवर भूखंड घोटाळ्यात गुन्हा

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 11:56PM

बुकमार्क करा
बंगळूर : प्रतिनिधी

माजी उपमुख्यमंत्री व भाजप नेते आर. अशोक यांच्यावर एका भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. एसीबीने नोंद केलेल्या गुन्ह्यानुसार आर. अशोक हे 1998 ते 2006 पर्यंत बंगळूर दक्षिण तालुका बिगरहुकूम जमीन नियमन समितीचे चेअरमन व उत्तर हळ्ळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्या  प्रकरणामध्ये आर. अशोक हे एक लाभार्थी आहेत. या भूखंड घोटाळ्यामध्ये सरकारी अधिकारी व इतरांचा समावेश आहे. त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा नोंद झाला.