Tue, Jul 23, 2019 04:02होमपेज › Belgaon › प्लास्टिकबंदी सरकारी कार्यालयापासूनच!

प्लास्टिकबंदी सरकारी कार्यालयापासूनच!

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 15 2018 12:19AMबंगळूर : प्रतिनिधी

राज्यामध्ये प्लास्टिकवर बंदी घालण्याची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल तर प्रथम सरकारच्या विविध खात्यामध्ये प्लास्टिकचा वापर करण्यावर बंदी घालावी लागेल, हे सरकारला उशिरा का होईना उमगलेले दिसते. त्यामुळेच आता सरकारी कार्यालयांमध्ये प्लास्टिकची बाटली आणण्यास सरकारने बंदी घातली आहे. प्लास्टिकऐवजी स्टील किंवा काचेची बाटली वापरण्याचा आदेश कर्मचार्‍यांना देण्यात आला आहे. 

कर्नाटकाने जुलै 2015 मध्ये प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पहिल्या तीन महिन्यांत प्लास्टिक पकडून वापरणार्‍यांकडून दंडही वसूल केला गेला. पण, सरसकट बंदी शक्य झालेली नाही. 

आता प्लास्टिकचा वापर करण्यावर बंदी  घालण्यासंदर्भात जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठीच सरकारी कार्यालयामध्ये बंदी घालण्याचा आदेश काढण्यात आलेला आहे. हा आदेश सरकारच्या प्रशासकीय सुधारणा खात्याने बजालेला आहे. प्लास्टिक बाटल्याऐवजी स्टील बाटल्या पाण्यासाठी वापरण्यात याव्यात,  विधानसौधदमध्ये व तेथील विविध सचिव कार्यालयामध्ये होणार्‍या सभा व बैठकांनाही प्लास्टिक बॉटलचा वापर न करता स्टीलचे तांबे वापरण्याचा आदेश बजाविण्यात आला आहे.

पुन्हा का चर्चेत?

गेल्याच महिन्यात महाराष्ट्र सरकराने सरसकट प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्नाटकातील प्लास्टिकबंदी पुन्हा चर्चेला आली. त्याबरोबरच सरकार बदलल्यानंतर जुन्या सरकारचे अंमबलबजावणी न झालेले निर्णयही अंमलात आणण्याचा प्रयत्न नवे सरकार करत आहे.