Mon, Apr 22, 2019 15:37होमपेज › Belgaon › सरकारी कार्यालयांत प्लास्टिकवर निर्बंध

सरकारी कार्यालयांत प्लास्टिकवर निर्बंध

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 09 2018 12:42AMबंगळूर ः प्रतिनिधी

सरकारी बैठका, समारंभात प्लास्टिक प्लेट, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, कव्हर यासारख्या वस्तू  वापरण्याला निर्बंध घालण्यात आला आहे. प्लास्टिकऐवजी स्टीलच्या वस्तू वापरण्यात याव्यात, असा आदेश राज्य सरकारने शुक्रवारी दुसर्‍यांदा जारी केला आहे.

सरकारने हा आदेश मागील महिन्यातच जारी केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे  सरकारच्या निदर्शनास आले आहे. 

सरकारी, निमसरकारी, महामंडळे, विद्यापीठातून चालणार्‍या सरकारी सभा?समारंभातून प्लास्टिकचा वापर  करता येणार नाही. प्लास्टिक  ग्लास, प्लेट, बाटल्या वापरण्याचा  प्रसंगच असल्यास ते पुन्हा वापरण्यात येणासारखे असावेत. एकदाच वापरात येणार्‍या वस्तू वापरण्याचे टाळावे, असे सरकारने आदेशात म्हटले आहे.