Sun, Jul 21, 2019 15:01
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › ६९ टक्के आयरिश गर्भपाताच्या बाजूने

६९ टक्के आयरिश गर्भपाताच्या बाजूने

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 28 2018 12:09AMबेळगाव : प्रतिनिधी

आयर्लंडमधील जनतेने जाचक गर्भपात नियंत्रण कायद्याला तीव्र विरोध करताना 67.09 टक्के मतदान केले. या ऐतिहासिक निकालामुळे आयरिश महिलांनी विशेष आनंद व्यक्‍त केला असून बेळगावातील सविता हालप्पनवर यांच्या त्यागाचे स्मरण केले.

शुक्रवार दि. 25 रोजी वीस लाख लोकांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. निकाल जाहीर झाल्यानंतर एकच जल्‍लोष करण्यात आला. त्याआधी एक्झिट पोलने कायद्याविरोधात निकाल लागणार असल्याचा अंदाज व्यक्‍त केला होता. आयर्लंडमधील अनेक ठिकाणी सविता यांचे पोस्टर्स उभारून पुष्पगुच्छ वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. 28 ऑक्टोबर 2012 रोजी सतरा आठवड्यांची गर्भवती असणार्‍या सविता यांचा मृत्यू झाला. कायद्यातील अटींमुळे डॉक्टरांनी त्यांचा गर्भपात करण्यास नकार दिला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद आयरिश संसदेत तीव्रतेने उमटले. दरम्यान, सहा वर्षे तेथील जनतेने कायदेबदलासाठी आंदोलने हाती घेतली. त्यानंतर तेथील सरकारला नमते घ्यावे लागले आणि कायद्याविरोधात मतदानाचा निर्णय घेतला.