Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Belgaon › पासपोर्ट फक्‍त पंधराशे रुपयांत

पासपोर्ट फक्‍त पंधराशे रुपयांत

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 10:23PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न सत्यात उतरले आहे.  येथील डाक कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्राची सुरुवात झाली आहे. अवघ्या पंधराशे रुपयांत 20 दिवसात पासपोर्ट मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. 

बुधवारी (दि.14) परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे, खा. सुरेश अंगडी आदींच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने बुधवारी व गुरुवारी 100 जणांचे अर्ज स्वीकारण्यात आले. काही दिवसांत अर्ज स्वीकारण्याची संख्या वाढविण्यात येणार आहे. कोणत्याही एजंटवर अवलंबून न राहता ऑनलाईन अर्ज भरून कागदपत्रे पासपोर्ट कार्यालयात दाखल करावीत, असे आवाहन पासपोर्ट कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 

नेट कॅफेतून ऑनलाईन अर्ज करावा. या अर्जामध्ये पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याची तारीख व वेळ असते. त्यानुसार कागदपत्रे सादर करावी लागतात. यानंतर बंगळूर येथील विभागीय कार्यालयातून कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर पासपोर्ट मिळतो. यासाठी दहावी गुणपत्रिका, बँक पासबुक, ओळखीसाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, वीजबिल व फोटो अशी कागदपत्रे गरजेची आहेत. यासाठी रिीीिेीींळपवळर.र्सेीं.ळप या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. 

कार्यालयात बंगळूरमधील 2 अधिकारी व डाक कार्यालयातून 2 कर्मचारी कार्यरत आहेत. सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत अर्ज स्वीकारले जात आहेत. बेळगाव शहरासह जिल्ह्यातूनही पासपोर्ट काढण्यासाठी प्रतिसाद मिळत आहे.