Wed, Jul 08, 2020 05:13होमपेज › Belgaon › प्रदूषणकारी कार्बन कारखाना अन्यत्र हलवा

प्रदूषणकारी कार्बन कारखाना अन्यत्र हलवा

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 1:34AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोवा कार्बन  लिमिटेड या कारखान्यामुळे  पसरलेल्या कार्बन प्रदूषणामुळे सां जुझे दे आरियल येथील लोकांचे जीवन कठीण बनले आहे. प्रदूषणामुळे  आरोग्याच्या समस्या उद्भवल्या  असून हा कारखाना अन्यत्र हलवून प्रदूषणापासून मुक्ती द्यावी, अशी मागणी करीत  सां जुझे दे आरियलच्या रहिवाशांनी पणजीत बुधवारी धडक मोर्चा काढला. सरकारने याप्रश्‍नी लक्ष न दिल्यास  वेळप्रसंगी विधानसभेवर मोर्चा काढू. मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवला जाईल, असे आकें बायश पंचायतीचे सरपंच सिध्देश भगत यांनी सांगितले.  

सोशल जस्टीस फोरमच्या बॅनरखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात सां जुझे दी आरियलच्या 250 रहिवाशी सहभागी झाले होते. या मोर्चात विद्यार्थ्यांचाही समावेश होता.  पणजी मार्केट येथील धेम्पो  कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्याची त्यांची योजना होती. मात्र,   पोलिसांनी हा  मोर्चा आझाद  मैदानावर  हलवला. फोरमचे उपाध्यक्ष  सेबी फर्नांडिस म्हणाले, सां जुझे दी आरियल येथे 1977 सालापासून  गोवा कार्बन लिमिटेड कारखान्यातून   कार्बनचे उत्पादन होत  आहे.  हा कारखाना धेम्पो कंपनीचा  आहे.  या कारखान्यामुळे तेथील लोकांना जीवन  जगणे कठीण झाले आहे.