Thu, Mar 21, 2019 23:31
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › पाक ध्वजप्रकरणी परशुराम वाघमारे निर्दोष

पाक ध्वजप्रकरणी परशुराम वाघमारे निर्दोष

Published On: Jul 24 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 11:50PMविजापूर : प्रतिनिधी

सिंदगी (जि. विजापूर) येथील तहसील कार्यालयासमोर पाकिस्तानचा ध्वज फडकवल्याप्रकरणी गौरी हत्या प्रकरणातील संशयित परशुराम वाघमारे निर्दोष सुटला आहे. 1 जानेवारी 2012 रोजी परशुरामसह सहाजणांनी तहसील कार्यालयासमोर पाकिस्तानचा ध्वज फडकविल्याचा आरोप होता.

मात्र, संशयितांविरूद्ध कोणतेच पुरावे आणि साक्ष नसल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचे न्यायाधीश गीता के. बी. यांनी सांगितले. सहा संशयितांपैकी एकजण अल्पवयीन असून त्याची सुनावणी बाल गुन्हेगार न्यायालयात होणार आहे. अनिल सोलकर, मल्‍लनगौडा पाटील, रोहित न्हावी, सुनील अगसर, अरूण वाघमारे अशी इतर पाच संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध कोणतेच पुरावे नाहीत. केवळ छायाचित्र असल्याने त्या आधारे शिक्षा देता येत नसल्याचे सांगून न्यायाधीशांनी संशयितांना सोडून दिले.