Mon, Aug 19, 2019 09:31होमपेज › Belgaon › पीओपी श्रीमूर्तीप्रश्‍नी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा : शाडूच्या मूर्तीला प्राधान्य देण्याचे आवाहन

...तर ‘त्या’ संस्थांवर गुन्हा दाखल करणार 

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 15 2018 12:17AMबेळगव : प्रतिनिधी

गणेशोत्सव दोन महिन्यांवर आला असून मूर्तिकार मूर्ती बनविण्याच्या कार्याला लागले आहेत. मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी)न बनविता शाडूच्या बनवाव्यात, अशी सूचना मूर्तिकारांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून  गेल्यावर्षीच करण्यात आली आहे.  पीओपीच्या मूर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यास गणेेश मंडळांना प्रोत्साहन दिल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.

उत्सवानंतर मूर्ती तलाव, नदी यासारख्या पाण्याच्या स्रोतांमध्ये विसर्जित करण्यात येत असतात. पीओपीच्या मूर्ती  पाण्यात लवकर विरघळत नाहीत. मूर्तीवरील रंग पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित बनते. त्याशिवाय रसायनमिश्रीत रंगाचे पाणी आरोग्याला अपायकारक ठरते. पावसाचे प्रमाण प्रतिवर्षी घटत असताने पाण्याची समस्या भेडसावत असते. मूर्ती विसर्जनामुळे पाणी दूषित होऊन ते वापरण्यास अयोग्य होते.

त्यामुळे मूर्ती पीओपीऐवजी मातीच्या किंवा शाडूच्या बनवाव्यात असा दंडक प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्तीकारांना गतवर्षीच जारी केला आहे. मात्र  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विचाराला सार्वजनिक गणेश मंडळांकडून विरोध झाला. पीओपीच्या मूर्ती या हलक्या असतात. तसेच पीओपी  मूर्ती सुबक असतात. त्यामुळे पीओपी मूर्ती बनविणार्‍यावरील दंडक मागे घेण्यात यावा, अशी मागणी अनेक गणेश मंडळांनी केली होती. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याला सहमत दर्शविलेले नाही.