Sun, Nov 18, 2018 23:56होमपेज › Belgaon › अन्यथा सामूहिक आत्महत्या करू

अन्यथा सामूहिक आत्महत्या करू

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 24 2018 8:53PMबेळगाव, प्रतिनिधी : शिक्षक नेमणूक प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेची नियमावली बदलावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाचीही दखल न घेतली गेल्यास सामूहिक आत्महत्या करु, असा इशारा पदवीधर तसेच विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. राज्यात 6 वी ते 8वी वर्गासाठी पदवीधर शिक्षकांची नेमणूक प्रक्रिया राबविण्यात येत होती. सुमारे दहा हजार जागा भरण्यात येणार आहेत. मात्र सदर प्रक्रियेत अडचणी येत आहेत. त्यामुळे बीए, बीएडधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

सीईटी दिलेल्या सार्‍याच उमेदवारांना शिक्षण खात्याने प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलविले होते. त्यामुळे शिक्षण खात्याचा कारभार चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे शिक्षण खात्याने उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करावी, अशी मागणी परीक्षार्थींनी केली होती. त्यानंतर सुधारित निकाल शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर  जाहीर केला गेला. सीईटीमध्ये अधिक गुण मिऴूनही शिक्षक भरतीत पदवीचे गुण ग्राह्य धरल्याने निवड प्रक्रियेत काही विद्यार्थी मागे राहिले. हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून, त्यासाठी नियमावलीत बदल करा असा जोर धरला जाऊ लागला आहे. 

आत्महत्या करण्याचा इशारा

शिक्षक नियुक्ती प्रक्रियेच्या विरोधा विद्यार्थी संघटना एकत्रित आल्या आहेत. सरकारने शिक्षक भरती प्रक्रियेच्या नियमावलित बदल करा, अशी मागणीचे निवेदन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एन. महेश आणि शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेचे गुण ग्राह्य धरावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. निमयावलीमधील त्रुटी दूर न झाल्यास विधानसौधच्या आवारात आत्महत्या करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. 

मागण्या काय?

शिक्षक नेमणूक प्रक्रियेतील नवीन नियमावली मागे घ्या, जुन्याच पद्धतीने निवड करा.
पदवीचे गुण ग्राह्य धरू नये.
समाज, विज्ञान शिक्षकांच्या जागा अधिक भरा