Wed, Jul 17, 2019 08:29होमपेज › Belgaon › दर असलेली पीके शेतकर्‍यांनी घ्यावीत

दर असलेली पीके शेतकर्‍यांनी घ्यावीत

Published On: Feb 13 2018 2:05AM | Last Updated: Feb 12 2018 11:35PMउगार खूर्द : वार्ताहर 

रस्ते, पाणी, वीज याबरोबरच मार्केटिंग या समस्या सुटल्याखेरीज शेतकरी सुखी होणार नाही. ज्या ज्या पिकांना दर आहे, अशी पिके शेतकर्‍यांनी घ्यावीत. शेती क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. तसे आपणही बदलले पाहिजे, असे आवाहन  कृषीतज्ज्ञांनी केले. 

‘शिवार 2018’ या कार्यक्रमाचे आयोजन उगार महिला मंडळाने केले होते. व्यासपीठावर सुरेश देशपांडे, तृप्‍ती पुरेकरे, प्रोषिता धळसासी, शामराव जहागीरदार, धनश्री शुक्‍ल प्रमुख उपस्थित होते. मंडळाच्या अध्यक्षा स्मिताताई शिरगावकर यांनी प्रास्ताविकात ‘शिवार 2018’ चा उद्देश सांगून स्वागत केले. 

शुक्‍ल म्हणाल्या शेतकर्‍यांनी लोकांच्या दारी जाऊन आपला माल विकावयाचा ही पध्दत बंद केली पाहिजे. पारंपरिक पध्दती सोडून उद्योगाप्रमाणे शेती व्यवसाय व्हावयास पाहिजे. देशपांडे म्हणाले जेथे झाडे तेथे पाणी असते. ती जगवली पाहिजेत. धळसासी यांनी विविध प्रकारच्या फळांचे दर आदीची माहिती दिली. फळापासून फूड टेक्नॉलॉजी प्रक्रिया करून जाम वगैरे कसे तयार करण्यात येतात ते सांगितले. 
पुरेकर यांनी स्वयंसिध्द व व्ही.टी. पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून शेती व जोडव्यवसाय करणार्‍या महिलांना कसे साहाय्य करण्यात येते, याची माहिती दिली. महादेव कटागिरे, भीमू गावराने, सत्याप्पा यशवंत या शेतकर्‍यांचा, साहिली काड, शारदा पाटील, रत्नाबाई गवंडी या शेतकरी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

देशाच्या विविध भागात साखर कारखाने झाल्यामुळे त्या भागाचा विकास झाला. बेरोजगाराना कामे मिळाली. उसाचे क्षेत्र वाढले. शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारली, अशी मते कृषितज्ज्ञांनी व्यक्‍त केली. 
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर ऊस लावण्यात आले होते. व्यासपीठास लागून हरभरा, गहू, जोंधळा, खपली अशी पिके कुंडीत घालून ठेवण्यात आली होती. समई केळीच्या खुंटापासून बनविण्यात आली होती. विविध भागातून वक्‍ते आले होते. त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. जी पिके बाजारात जास्त किमतीने विकली जातात, ती घ्यावीत आणि शेतकर्‍यांनी स्वयंपूर्ण व्हावे, असा सल्‍ला त्यांनी दिला.