Tue, Jul 16, 2019 13:37होमपेज › Belgaon › चिकोडी तालुक्यात वीज पुरवठा खंडीत करण्याचा आदेश

चिकोडी तालुक्यात वीज पुरवठा खंडीत करण्याचा आदेश

Published On: Feb 09 2018 10:40AM | Last Updated: Feb 09 2018 10:39AMचिकोडी : प्रतिनिधी 
बेळगाव जिल्हाधिकारी एस जियाउल्ल यांनी चिकोडी अथणी रायबाग तालुक्याच्या भागात वीज पुरवठा खंडित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने हा आदेश देण्यात आला आहे.

प्रति शनिवारी सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 6 पर्यंत वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. केवळ पिण्यासाठी नदीच्या पाण्याचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे शेतीसाठी नदीचे पाणी न वापरण्याची सूचना देण्यात आली आहे.