Thu, Jul 18, 2019 21:34होमपेज › Belgaon › पाचशे रुपयांच्या लाचेमुळे मिळाली सक्‍तीची निवृत्ती

पाचशे रुपयांच्या लाचेमुळे मिळाली सक्‍तीची निवृत्ती

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 15 2018 9:05PMबेळगाव : प्रतिनिधी       

वीस वर्षांपूवी 500 रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून राज्य विमा कंपनीतील द्वितीय श्रेणीतीतील सहाय्यकाला (एसडीए) सक्तीची निवृत्त घेण्याचा आदेश  सरकारने बजावला आहे. रामण्णा डी. नायक असे या कर्मचार्‍याचे नाव आहे.

राज्य सरकारी विमा खात्याच्या  (इएसआय) बेळगाव जिल्हा कार्यालयात द्वितीय श्रेणी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले नायकने  500 रु.ची लाच घेतल्याची तक्रार 16 एप्रिल 1998 रोजी दाखल झाली होती. नायकला 6 मार्च 2018 पासून  कामावर हजर न राहण्याचा अर्थात सक्तिने निवृत्त घेण्याचा आदेश जारी झाला आहे.

पोलिस खात्यामध्ये कॉन्स्टेबल म्हणून काम करीत असलेले सुलेश दुर्गप्पा अंडोरी यांचे आकस्मिक निधन झाले होते. राज्य सरकारी विमा खात्याकडून मयत अंडोरी यांची काही रक्कम येणेबाकी होती. ती मंजूर करण्यासाठी खात्यातील द्वितीय दर्जाचे सहाय्यक नायकने मयत कॉन्स्टेबल अंडोरी यांचे नातेवाईक विजयकुमार यांच्याकडे 500 रु.ची मागणी केली होती.  विजयकुमारनी लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केलयनंतर विजयकुमार यांच्याकडून लाच स्वीकारताना नायक 16 मे 1998 रोजी लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकला होता. त्यानंतर कर्नाटक नागरी सेवा नियम 1957 च्या नियम 8 अन्वये रामण्णा नायकला कामावरून सक्तीने निवृत्त करण्यात यावे, अशी शिफारस लोकायुक्त खात्याने सरकारकडे 30 डिसेंबर2003 रोजी केली होती.

प्रकरणाची चौकशी पूर्ण करून  न्यायालयाकडे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र आरोप सिध्द न झाल्याने रामण्णाला 25 ऑगस्ट 2007 रोजी आरोपातून मुक्त करण्यात आले होते. पुढे न्यायालयातील गुन्हेगारी प्रकरण तसेच लोकायुक्त संस्थेने केलेल्या खातेनिहाय चौकशीत विभिन्नता असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या  सूचनेचे पालन करावे लागत असल्याचे राज्य सरकारने आपल्या आदेशात स्पष्ट करून नायकला सक्तीने निवृत्ती घ्यावी, असे म्हटले आहे.