Mon, May 27, 2019 00:46होमपेज › Belgaon › पेट्रोलबॉम्ब फेकणारे दोन युवक ताब्यात?

पेट्रोलबॉम्ब फेकणारे दोन युवक ताब्यात?

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 27 2018 10:57PMबेळगाव : प्रतिनिधी

बहुचर्चित पद्मावत चित्रपटाला विरोध करत गुरुवारी रात्री ऐन गर्दीच्यावेळी प्रकाश थिएटरच्या आवारात पेट्रोलबॉम्ब फेकणार्‍या दोन समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

गुरुवारी दिवसभराचे तीन शो सुरळीत पार पडल्यानंतर रात्रीच्या शोच्या आधी दोन दुचाकीस्वार समाजकंटकांनी पेट्रोलबॉम्ब टाकुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे खळबळ माजली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासले असता, एसपीएम रोडवरुन दुचाकीवर बसून आलेल्या दोघांनी थिएटरसमोर दुचाकी थांबवली. मागे बसलेल्याने पिशवीतील बाटली काढली ल बाटलीच्या तोंडावर असलेल्या सुतळीला आग लावली आणि ती बाटली थिएटर आवारात फेकली. त्यामुळे आवारात आगीचा लोळ उठला. त्यानंतरक गर्दीत ते दोघे समाजकंटक दुचाकीवरुन रेणुका हॉटेल गुडशेड रोड मार्गे निघून गेले. 

प्रजासत्ताक दिनाच्या तयारीत असलेल्या पोलिसांना माहिती मिळताच, खडेबाजार पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर झाला. पोलिसांनी प्रकाशचे संचालक महेश कुगजी यांच्याकडून माहिती घेतली. याचवेळी काहींनी दुचाकीवरुन दोघेजण असल्याची माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी प्रकाश, कपिलेश्‍वर ब्रिज आणी रेणुका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमधे कैद् वाहनाचा क्रमांक आणि चेहरेपट्टीवरून पोलिसांनी शुक्रवारीच दोघांना ताब्यात घेतले आहे. मात्र, खडेबाजार पोलिस निरीक्षकांंनी अधिक बोलणे टाळले