Mon, May 20, 2019 20:47होमपेज › Belgaon › खुली जागा, मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

खुली जागा, मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

Published On: Jul 17 2018 1:29AM | Last Updated: Jul 16 2018 10:10PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यात प्रथमच ड्रोन आधारित जमिनीचे आणि मालमत्तेचे सर्वेक्षण होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षणास सुरूवात होत असून कमीतकमी वेळेत हे काम पूर्ण होणार असल्याचे महसूल मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी नुकतेच बंगळूर येथे जाहीर केले.

कर्नाटक भू महसूल अधिनियम 1964 उपनियमानुसार दर तीस वर्षांनी जमिनीचे सर्वेक्षण करावे लागते. त्यानुसार सरकारी अधिकारी सर्वेक्षणाचे काम हाती घेतात. सध्या पारंपरिक पद्धतीनुसार हे काम सुरू आहे. पण, या कामाला विलंब होत असल्याने तसेच गोंधळ दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व्हे ऑफ इंडियाच्या सहकार्याने ड्रोन आधारित जमीन आणि मालमत्ता सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. 

मानव आधारित सर्वेक्षणामुळे भू मापकामुळे सर्वेक्षणाचे काम केले जात होते. कामाची पारदर्शकता आणि अचूकपणाबाबत गोंधळ होता. यामुळे ड्रोनचा पर्याय शोधण्यात आला आहे. बंगळुरातील जयनगर येथील चार हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. रामनगर अणि त्या भागातील जमीन, मालमत्तांचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे. 

ड्रोन आधारिक सर्वेक्षणामुळे दोन महिन्यांचे काम दोन दिवसांत पूर्ण होते. भू मापकांच्या म्हणण्यानुसार नव्हे तर ड्रोद्वारे अचूक मोजमाप होते. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने यामध्ये पारदर्शकता असते. त्याचबरोबर खर्चही कमी येतो. ड्रोनचा सध्या प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येत आहे. त्यातील यश, अचूकता, पारदर्शकतेच्या आधारावर संपूर्ण राज्यात असे सर्वेक्षण होणार आहे. वेळेची बचत, कमी खर्च, अचूकता, पारदर्शकता अशी ड्रोन आधारिक सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये आहेत.

ड्रोन काय आहे?

ड्रोन हे एक यंत्रोपकरण असून, ते जमिनीवरून नियंत्रकाच्या (रिमोट) सहाय्याने हवेत उडवता येते. ड्रोनला ठरावीक वजनापर्यंतची कसलीही वस्तू अडकवता येते. त्यानुसार कॅमेर बसवून एखाद्या विशिष्ट स्थळाचे हवेतून छायाचित्रण किंवा चित्रीकरण करता येते. वस्तू घरपोच करण्यासाठीही ड्रोनचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.