Sat, Jul 20, 2019 02:14होमपेज › Belgaon › ...तरच भारत सुदृढ राष्ट्र बनेल

...तरच भारत सुदृढ राष्ट्र बनेल

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 27 2018 11:04PMबेळगाव : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय घटनेनुसार राज्यकारभार चालविला तरच भारत सुदृढ व सामर्थ्यशाली राष्ट्र बनेल, असे गौरवोद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री रमेेश जारकीहोळी यांनी जिल्हा क्रीडांगणावर आयोजित प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणानंतर बोलताना काढले. 

ते म्हणाले, डॉ.आंबेडकर यांची घटना सामाजिक न्याय व सर्व नागरिकांना समान अधिकार प्रदान करणारी आहे. त्यांची ही घटना संपूर्ण जगामध्ये आदर्श बनली आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे राज्य सरकारमार्फत सामाजिक न्याय देण्याचे कामकाज बजावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या विकासामध्ये कर्नाटकाचा वाटा खूपच महत्वाचा आहे.  यावेळी केएसआरपी, डीएआर, पोलिस, गृहरक्षक दल, महिला पोलिस, व एनसीसी कॅडेंटसनी शानदार  पथसंचलन करून पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. 

पाच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बेळगावच्या राजेंद्र कलघटगी, बेळवडी गावच्या सुबराव हुद्दार यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सरकारी अधिकार्‍यांनी उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यामध्ये आरोग्यधिकारी शशिधन नाडगौडा, अक्षरदासोह योजनेचे सहाय्यक संचालक अब्दुल रशिद मिरजण्णावर, सरकारी उद्योग प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक संचालक चिदानंद बाके, जिल्हापोलिस कार्यालयातील सहाय्यक अधिकारी प्रविण बजंत्री, सुळेभावी ग्रा.पं.चे विकास अधिकारी श्रीदेवी हिरेमठ यांचा त्यामध्ये समावेश आहे.