होमपेज › Belgaon › ऑनलाईन शुभमंगलम्...सावधान !

ऑनलाईन शुभमंगलम्...सावधान !

Published On: Dec 05 2017 1:49AM | Last Updated: Dec 04 2017 9:52PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

भारतीय परंपरेत विवाह संस्कृतीला फार मोठे महत्त्व आहे. दिवाळी सणानंतर हिंदू धर्मात लग्न समारंभ सुरू होतात. अनेक तरुण, तरुणी ऑनलाईन पद्धतीने आपला जोडीदार शोधत असतात. अशावेळी आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. यासाठी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे इंटरनेटवर जीवनसाथी शोधत असाल तर सावधान! म्हणण्याची वेळ आली आहे. 

सध्या इंटरनेटचा वापर करून मोठ्या प्रमाणावर जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न तरूण वर्ग करत असतो. परंतु काहीवेळा फसवणूक होण्याची शक्यता असते. डिजिटल युगात आयुष्यभराचा जोडीदार निवडण्यासाठी सध्याच्या घडीला अनेक जण वेबसाईटचा आधार घेतात. पण, अशा वेबसाईटवरून जोडीदार निवडणे काहीवेळा महागात देखील पडू शकते. 

विवाहासाठी आपली माहिती भरून अनेक वेबसाईटवरून नोंदणी केली जाते. अनेकवेळा खोटी माहिती भरली जाते. अशावेळी तरुण किंवा तरुणींचीही फसवणूक होण्याची  शक्यता असते. आधुनिक युगात ऑनलाईन पद्धतीने विवाह करण्याचे वारे जोरात वाहू लागले आहे. शहरी भागात जुन्या परंपरेप्रमाणे कुटुंबियांच्या पसंतीने मुलगी, मुलगा बघणे ही पद्धत हळूहळू इतिहासजमा होत चालली आहे.  

काहीजण मुलींच्या नावाने सोशल मीडियावर खोटे अकाऊंट काढून चॅटिंग करत असता. यावेळी पैशांची मागणी केली जाते. समोरचा व्यक्ती मुलगी आहे असे समजून पैसेही दिले जातात. पैसे घेतल्यानंतर मोबाईल क्रमांक बंद केला जातो. अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामुळे ऑनलाईन जोडीदार निवडताना काळजी घेण्याची गरज आहे.  

फेसबूक, व्हॉट्सअप आदी सोशल माध्यमांच्या आधारे देखील प्रेमविवाह तसेच याद्वारे फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. फेसबुकच्या माध्यमातून मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तिच्याशी गप्पा मारणे. व काही दिवस गेल्यानंतर तिच्याकडून पैशांची मागणी केली जाते. बरेच पैसे उकळल्यानंतर मोबाईल क्रमांक बंद केला जातो. यामुळे सावध राहणे गरजेचे आहे.