Tue, Jan 22, 2019 01:30होमपेज › Belgaon › एकीसाठी उपोषणास्त्र

एकीसाठी उपोषणास्त्र

Published On: Apr 21 2018 12:59AM | Last Updated: Apr 21 2018 12:10AMबेळगाव : प्रतिनिधी

म. ए. समितीच्या दोन गटांमध्ये सुरू असणारी एकीची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. त्यामुळे एकीसाठी प्रयत्नशील असणार्‍या सुरेश हुंदरे स्मृती मंचतर्फे रविवारी शिवाजी उद्यानात उपोषण केले जाणार आहे. शहरात दोन्ही गटांमध्ये एकीच्या अनेक फेर्‍या घेऊनदेखील काही नेत्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एकीची प्रक्रिया रखडली आहे. यामुळे शहर म. ए. समितीने उमेदवारीदेखील जाहीर केली. यामुळे स्मृती मंचच्या कार्यकर्त्यांकडून उपोषण अस्त्र उपसण्यात आले आहे. रविवारी शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत. यामध्ये मराठी भाषिक उद्योजक, वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. राम आपटे यांनी दिली आहे.

तालुका सकारात्मक

शहरात एकीची प्रक्रिया धूसर बनत असताना ग्रामीण मतदारसंघातील दोन्ही गटांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. एकीबाबत शनिवारी सायंकाळपर्यंत निर्णय होणार आहे.तालुक्यातील दोन्ही गटांतील नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उशिरापर्यंत बैठक झाली. यामध्ये दोन्ही गटांनी आपला उमेदवार निश्‍चित करून उमेदवाराची नावे निश्‍चित करावीत. ही नावे मध्यवर्ती म. ए. समितीकडे देण्यात येतील. त्यापैकी एका उमेदवाराची निवड वरिष्ठाच्या चर्चेनुसार घोषित करण्यात येतील, असा ठराव करण्यात आला. त्याला दोन्ही गटांनी मान्यता दिली आहे.

Tags : Belgaum, One, process, still, going