Tue, Nov 13, 2018 22:14होमपेज › Belgaon › दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार

दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार

Published On: Mar 22 2018 1:52AM | Last Updated: Mar 22 2018 1:51AMबेळगाव : प्रतिनिधी

दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत बंगळूरचा अभियंता लियानो इमॅन्युएल एन. (वय 24) हा ठार झाल्याची दुर्घटना बुधवारी सकाळी 9.20 च्या सुमारास ग्लोब थिएटरसमोरील बीएसएनएल कार्यालयाजवळ घडली. 

यावेळी दुचाकीचालक राकेश राजेंद्र (वय 24, रा. नंजनगुड म्हैसूर) हा जखमी झाला आहे. मृत युवक येथील अल्मा मोटर्समध्ये अभियंता म्हणून कार्यरत होता. अपघाताची नोंद रहदारी दक्षिण विभागात झाली आहे.  

लियानो व राकेश दुचाकीवरून संभाजी चौकातून गोगटे सर्कलकडे जाते होते. तर दुचाकीस्वार प्रकाश मारुती कोळीकोप्प (वय 21, रा. यमनापूर) हा बीएसएनएलकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होता. यावेळी अभियंत्यांच्या दुचाकीला ठोकर दिली. ठोकर बसताच तिघेही दुचाकीस्वार रस्त्यावर पडले. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या लियानोच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. प्रकाश हाही जखमी आहे. 

विद्यार्थिनींची मदत

लियानो घटनास्थळी पडलेला असताना रस्त्यावरून जाणार्‍या नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या छातीवर दाब देऊन त्याचा श्‍वासोच्छ्वास पूर्ववत करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मात्र, डोक्याच्या दुखापतीमुळे लियानोवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.