Sat, Jul 20, 2019 15:19होमपेज › Belgaon › मंगळवेढ्याजवळ अपघातात सौंदलग्याचा व्यावसायिक ठार

मंगळवेढ्याजवळ अपघातात सौंदलग्याचा व्यावसायिक ठार

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:28AMमंगळवेढा /निपाणी : प्रतिनिधी

सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर शहरापासून चार किलोमीटर अंतरावर गुरुवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास थांबलेल्या टेम्पो (क्र. एम.एच 13 ए.एक्स 3015)ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने स्कॉर्पिओ (क्र. एम.एच 09 सी.जे 9000) मधील अण्णाप्पा रामचंद्र गाडीवड्डर (वय 48, रा.  हालसिद्धनाथनगर, कुर्ली रोड, सौंदलगा)  हे जागीच ठार झाले. 

या अपघातात संतोष सुरेश लिगाडे (रा.निपाणी), बाबासाहेब ऊर्फ पिंटू पोकले (रा. यमगरर्णी, ता निपाणी) शिवाजी पाटील (रा. एकंडी ता. कागल), श्रीकांत पाटील (रा. अतिग्रे ता. हातकणंगले), अजित कोकणे (रा नानीबाई चिखली, ता. कागल), काशीनाथ आप्पासाहेब चौगुले (रा.हालसिध्दनगर सौंदलगा ता. चिकोडी, जि. बेळगाव) हे जखमी झाले आहेत. 

या अपघाताची फिर्याद  किसन गाडीवड्डर यांनी मंगळवेढा पोलिसात दिली आहे. या फिर्यादीमध्ये अपघातग्रस्त हे मंगळवेढा मार्गे जळकोट (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील पोलिस स्टेशनकडे सोमवारी निघाले होते असे सांगण्यात आले. 

त्या भागात यांचा वाळूचा ट्रक पकडण्यात आला होता. त्याची माहिती घेण्यासाठी ते निघाले होते. मंगळवेढा येथे आले असता सोलापूर रस्त्यावर पांढर्‍या रंगाचा टेम्पो रस्त्याच्या बाजूस पाठी मागील चाक पंक्चर झाल्याने उभे केले असल्याचे लोकांकडून सांगण्यात आले मात्र या टेम्पोला माल काळ्या ताडपत्रीने झाकण्याते आले असल्याने रिफ्लेक्टर दिसत नाही. तसेच इंडीकेटर लावण्यात आला नाही. इतर वाहनांना दिसणार नाही. अशा पद्धतीने वाहन रस्तावर असल्याने हा अपघात घडला असे फिर्यादीत म्हटले आहे. या अपघातातील जखमींना सोलापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद मंगळवेढा पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पािेलस करीत  आहेत.

सौंदलगासह परिसरावर शोककळा 

अपघाताची माहिती समजताच मृताच्या व जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे सौंदलगासह परिसरावर शोककळा पसरली. गाडीवड्डर हे वाळू व्यावसायिक होते. ते जळकोट ता. मुखेड, जि. नांदेड येथे व्यवसायानिमित्त गेले होते. परत येताना अपघात घडला. 

माजी ता. पं. उपाध्यक्ष गणपती गाडीवड्डर यांचे अण्णाप्पा गाडीवड्डर हे भाऊ होते. गुरुवारी सायंकाळी अण्णाप्पा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गाडीवड्डर यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 

Tags : belgaon, belgaon news, Mangalwedha solapur, accident,