Sat, Apr 20, 2019 07:59होमपेज › Belgaon › साखरपुड्याहून परतत असताना काकतीजवळ दुचाकीस्वार ठार

साखरपुड्याहून परतत असताना काकतीजवळ दुचाकीस्वार ठार

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:58AMकडोली : वार्ताहर

साखरपुड्याहून परतणार्‍या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो ठार झाला, तर आणखी एक जण जखमी आहे.सुरेश बाबू सदावर (वय 42, रा. देवगिरी मेन रोड) असे मृताचे नाव आहे. तो गवंडी होता.

रविवारी बेळगावहून मोटारसायकलवरून देवगिरीला घरी परतत असताना काकतीजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने सुरेश गंभीर जखमी झाला. लगेच त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे उपचार सुरू असताना रात्री निधन झाले. 

सुरेश आंबेवाडीला मोटारसायकलवरून साखरपुड्याला गेला होता. कार्यक्रम आटपून काकतीमार्गे येत असताना मुत्तेनहट्टी क्रॉसजवळ हा अपघात घडला. त्यांच्यासमवेत बाळू शट्टुप्पा बिर्जे (बंबरगा) हा इसम गंभीर जखमी झाला असून सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.