Wed, Nov 14, 2018 01:56होमपेज › Belgaon › नेरशाचा शेतकरी हिडकल पुलावर ठार

नेरशाचा शेतकरी हिडकल पुलावर ठार

Published On: Mar 24 2018 1:46AM | Last Updated: Mar 24 2018 12:22AMबेळगाव: प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर घटप्रभा नदीपुलानजीक कटांबळी गावाच्या फाट्यावर शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना घडली. राजशेखर दुंडाप्पा हिरेमठ (वय 54, रा. अशोकनगर, नेरसा, खानापूर) असे त्या शेतकर्‍याचे नाव आहे.

हिरेमठ हे मूळचे बिरनोळी कटांबळी गावचे रहिवासी असून सध्या ते नेरसा येथे राहतात. त्यांची शेती कटांबळी येथे असून ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ट्रकने गावाहून शेतीकडे येत होते. कटांबळीनजीक ते ट्रकमधून उतरून रस्ता पास करून जात होते. त्यावेळी बेळगावहून कोल्हापूरकडे जाणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत राजशेखर यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांच्यासोबत असलेले दुसरे शेतकरी बाजूला झाल्याने सुदैवाने बचावले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक सचिन हुक्केरी यांनी धाव घेत यमकनमर्डी पोलिसांना  माहिती दिली. पीएसआय एस. बी. पाटील यांनी पंचनामा केला. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिस ठाण्यात झाली आहे.