Fri, Mar 22, 2019 07:42होमपेज › Belgaon › अपघातात एक ठार

अपघातात एक ठार

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 11:44PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावात असलेल्या लहान भावाची प्रकृती बरी नसल्याने भेटावयास येणार्‍या मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी होनगा येथे महामार्गावर घडली. महामार्गावर थांबलेल्या कंटेनरला ओम्नी कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.  यात पाचजण जखमी झाले.

होनगा येथे महामार्गावर कंटेनर थांबला होता. मिरजेहून येणार्‍या  कारने कंटेनरला जोराने धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. यामध्ये जावेद हुसेन मुश्रीफ (वय 65, रा. मिरज) असे ठार झालेल्याचे नाव आहे.  सबाबी मुश्रीफ (वय 50), अल्ताफ मुश्रीफ (वय 17), सफीजा मुश्रीफ (वय 15), नेहल गुलाब मकानदार (वय 30), (अतिक अल्ताफ  मुश्रीफ (वय 17, सर्वजण रा. मिरज) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना  जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहेे. 

मिरज येथील मुश्रीफ परिवार बुधवारी कारमधून बेळगावकडे येत होता. जावेद मुश्रीफ यांचा भाऊ बेळगावात असून त्याची तब्येत ठीक नाही. त्याला भेटण्यासाठी ते येत होते. होनगा येथे आले असता ओम्नी चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. सीटबेल्ट काढतेवेळी चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. जखमींवर जिल्हा इस्पितळात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.