Mon, Mar 18, 2019 19:21होमपेज › Belgaon › ‘दैवज्ञ’मधील एक कोटीच्या दागिन्यांची चोरी

‘दैवज्ञ’मधील एक कोटीच्या दागिन्यांची चोरी

Published On: Jul 08 2018 1:43AM | Last Updated: Jul 08 2018 1:43AMबेळगाव : प्रतिनिधी

येथील कालिका दैवज्ञ सौहार्द सहकारी सोसायटीचा व्यवस्थापक आणि दोन वसुली कर्मचार्‍यांना सोसायटीतील 1 कोटीचे दागिने चोरल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. व्यवस्थापक असलेला मंगेश शशिकांत शिरोडकर (वय 45, रा. हरिनिवास शास्त्रीनगर), श्रीशैल यल्लाप्पा तारिहाळ (वय 35, रा. मराठा गल्ली मारिहाळ), मारुती महाबळेश्‍वर रायकर (वय 45, रा. नार्वेकर गल्ली शहापूर), अशी अटक झालेल्या तिघांची नावे आहेत.

खडेबाजार पोलिस ठाण्यात सोसायटी चेअरमन शशिकांत कारेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई झाली. सोसायटीमध्ये मंगेश शिरोडकर हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. तर श्रीशैल वसुली अधिकारी होता. सोसायटीमध्ये अनेक ग्राहकांनी सोने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे. अशा अनेक ग्राहकांचे जवळपास 1 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने गेल्या 18 एप्रिलरोजी लंपास करण्यात आले होते. खडेबाजार पोलिसांनी तपास हाती घेतला होता. तब्बल  चार महिन्यानंतर संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांची रवानगी पोलि कोठडीत करण्यात आली आहे.