Fri, Apr 26, 2019 03:22होमपेज › Belgaon › काँग्रेसकडे उमेदवारीसाठी दीड हजार अर्ज

काँग्रेसकडे उमेदवारीसाठी दीड हजार अर्ज

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 16 2018 1:23AMबंगळूर : प्रतिनिधी

राज्यातील 224 विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी 1500 पेक्षा जास्त जणांनी अर्ज केले आहेत.  कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यासाठी काँग्रेस कमिटीने एका रिसॉर्टमध्ये बैठकीसाठी ठाण मांडले आहे. सदर रिसॉर्ट बंगळूर शहराबाहेरील देवनहळ्ळीजवळ आहे. सदर काँग्रेस कमिटीमध्ये 40 नेत्यांचा समावेश आहे. 

मुख्यमंत्री सिध्दरामय्या, काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री एम. वीराप्पा मोईली, ऊर्जा मंत्री बी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचा समावेश आहे.

बैठकीनंतर डी. के. शिवकुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, संभाव्य उमेदवारांची यादी आम्ही अखिल भारतीय काँग्रेस सेंट्रल कमिटीला अंतिम निवडीसाठी पाठवून देणार आहोत. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मधुसुदन मिस्त्री यांनीही काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये उमेदवारांच्या नावांची छाननी केली आहे.

सदर अर्ज प्रत्येकी 100 रुपयाला पक्ष कार्यालयातून विक्री करण्यात आले आहेत. त्याशिवाय अर्ज सादर करण्यासाठी मंत्र्यांसाठी 1 लाख रुपये, आमदार, विधान परिषद सदस्यांसाठी 50,000 रु., खासदारांसाठी 25000 रुपये व माजी आमदार, खासदारांसाठी प्रत्येकी 20000 रुपये आणि अनुसुचित जाती जमातीच्या उमेदवारासाठी प्रत्येकी 15000 रु.शुल्क ठेवण्यात आले आहे.