Fri, Apr 19, 2019 08:18होमपेज › Belgaon › जुनी नाणी, तिकिटांतून इतिहास दर्शन

जुनी नाणी, तिकिटांतून इतिहास दर्शन

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 11:09PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

भारताचा इतिहास, संस्कृतीची माहिती जुनी नाणी व टपाल तिकिटांमार्फत शहरवसियांना उपलब्ध करून दिली आहेत. ही  कौतुकास्पद गोष्ट आहे. नवीन पिढीला जुनी नाणी व तिकिटांसंबंधी माहिती नाही. त्यांना हे एक आश्‍चर्यच आहे, असे प्रतिपादन कारंजी मठाचे गुरुसिद्ध स्वामी यांनी केले. 

जुनी टपाल तिकिटे व नाणी गोळा करण्याचा छंद असलेल्या फिलोटेलिक अँड नुमिसमेटिक गटातर्फे जुनी नाणी व टपाल तिकिटे व नाण्यांचे प्रदर्शन पार पडले. गुरुवारी (दि.4) दानम्मादेवी कल्याण मंडपात आयोजित प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. एस. एम. दोड्डमणी, एस. डी. कुलकर्णी, चंद्रशेखर बेंबळगी, आय.जी.परमशेट्टी, आदेश बर्डे, प्रसाद हिरेमठ, प्रशांत जेडी, एस. टी. चौगुले, एस. जी. कलघटकर आदी उपस्थित होते.

एक रुपयाच्या नोटेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात विविध देशांतील नोटा, स्टँम्प, प्राणी, पक्षी, आर्मी, क्रिकेट आदी प्रकारातील स्टॅम्प मांडण्यात आले आहेत. 1 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांच्या नोटा तसेच 2 पैशांपासून 10, 50, 100, 1000 रुपयांचे नाणी देखील प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.