Thu, Jan 24, 2019 04:13होमपेज › Belgaon › ‘जुन्या सायकली करा दान’

‘जुन्या सायकली करा दान’

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 15 2018 12:12AMबेळगाव : प्रतिनिधी

फेसबुक फ्रेंंडस सर्कलने गरीब, होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना सायकली पुरविण्यासाठी सोशल मीडियावर जुन्या सायकली देण्याच्या केलेल्या आवाहनास बेळगावकरांचा प्रतिसाद मिळत आहे. 

सर्कलचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी सोशल मीडियावर गरजू विद्यार्थ्यांची दखल घेऊन वापराविना असलेल्या जुन्या सायकली स्वीकारण्याबाबतचे आवाहन केले होते. शहर परिसरात व बेळगाव तालुक्यात अनेक प्राथमिक शाळांना विद्यार्थी आपापल्या गावाहून दोन ते तीन किलोमीटर चालत जातात. अशांसाठी समाजाच्या माध्यमातून सायकली मिळविण्यासाठी  फेसबुक फे्ंरडस सर्कल प्रयत्न करीत आहे. 

निंग्यानट्टी (ता. बेळगाव) येथील शाळेला पाच किलोमीटरवरून चालत येतात. अशा पद्धतीने अनेक गावात  विद्यार्थ्यांना चालत जावे लागत आहे. अशा गावातून खासगीसह शासकीय बसेसही उपलब्ध नाहीत. अशा विद्यार्थ्यांना आता या सर्कलचा आधार मिळणार आहे. 

या उपक्रमाला दाद देत  आनंदनगर, अनगोळ येथील रहिवासी व अमृता विद्यालयाचा विद्यार्थी हर्षिल विशाल गीते याने सर्वप्रथम आपली जुनी सायकल देऊन मदत केली. ही सायकल हर्षिल गीते, वेगा हेल्मेट कंपनीचे मार्केटींग व्यवस्थापक विशाल गीते, माजी सैनिक पी. एस. नंदीहळ्ळी यांच्या उपस्थितीत दरेकर यांच्याकडे सुपूर्द केली. दरेकर म्हणाले, दुर्गंम भागातील मुले शिक्षणासारख्या प्रवाहात येणे गरजेचे आहे. जाण्या-येण्याच्या गैरसोयीमुळे अनेक लहान मुले शिक्षणापासून वंचित आहेत. ययामुळे हा उपक्रम सुरू केला  आहे. यापूर्वीही या सर्कलतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले होते.