Tue, Apr 23, 2019 18:03होमपेज › Belgaon › ‘ओखी’चा सोशल मीडियावर धुमाकूळ!

‘ओखी’चा सोशल मीडियावर धुमाकूळ!

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 07 2017 10:58PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

देशातील काही राज्यात ओखी वादळामुळे निर्माण झालेल्या घबराटीचे सोशल मीडियावर हसू केले जात आहे. फेसबूक व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल मीडिीयावर पावसावरील कविता, विनोद, विडंबनाचा व गमतीदार पोस्टचा वर्षाव होत आहे. या वादळाचा बेळगावलाही काही अंशी फटका बसला असून   विनोदी पोस्टसह अनेक ठिकाणच्या व्हिडिओ क्‍लिपदेखील व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहेत. गेले तिन दिवस सोशल मिडियावर या विडंबनात्मक पोस्टने अक्षरशः धुमाकूळ घातला. 

यामध्ये या वादळाचा शोध बहूधा अशोक सराफांनी लावला असावा....वक्खा विक्खी ओखी. कुणाच्या पावसाच्या कविता टाकायच्या राहिल्या असतील तर पटकन टाका पावसाळा परत आलाय. आमच्याकडे स्वेटरला प्लास्टिक लावून मिळले. कुणाची पावसाळी पिकनिक राहिल असेल तर उरकून घ्या परत तो परत आलाय. तोरण लावा दारी सुखाची किरणे येई घरी, पूर्ण होवो तुमच्या इच्छा, हिवाळ्यातल्या पावसाच्या हार्दीक शुभेच्छा. मेरा देश बदल रहा है, थंडी मे पाऊस पड रहा है. आता नवीन ऋतू सुरु झालाय. 

हिवाळ्यात पाऊस पडल्याने अनेकांनी या ऋतूचे हिवसाळा असे नामकरण केले. आयुष्यात उन्हाळे, पावसाळे पाहण्यावरून वयाचा अंदाज बांधण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मी तुझ्यापेक्षा अधिक पावसाळे पाहिल्याच्या म्हणीचा वापर करून, पूर्वीच्या पिढीपेक्षा आताची पिढी जास्त पावसाळे पाहतेय. असे निरिक्षणही नेटकर्‍यांनी नोंदविले. अनेकांनी बदलत्या वातावरणावर बोलाताना बालपणीचा काळ आठवला. आम्ही शाळेत असताना ही वादळं कुठे मेलेली काय माहित? अशा शब्दात अनेक तरुणांनी आपला निसर्गाबद्दलचा त्रागा व्यक्त केला. 

अचानक आलेल्या पावसाला गोंजारत प्रिय पाऊस परत एकदा वांदे करूस...काय ते एकदाच सांग...स्वेटर घालू की रेनकोट? असा चिंतायुक्त प्रश्‍न मोठ्या अदबीने विचारला जात होता. अशा या संदेशांमुळे अनेकांच्या मनोरंजनात भर पडत होती. मात्र, हा मुद्दा जितका गमतीदार आहे, तीतकाच भयानकही आहे.