Fri, Nov 16, 2018 22:19होमपेज › Belgaon › अधिकाऱ्यांची चूक; एकाची जमिन दुसऱ्याच्या नावावर

अधिकाऱ्यांची चूक; एकाची जमिन दुसऱ्याच्या नावावर

Published On: Feb 03 2018 6:09PM | Last Updated: Feb 03 2018 6:09PMचिकोडी : प्रतिनिधी 

विकत घेण्यात आलेली जमीन अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे दुसऱ्याच्या नावाने झाल्याची घटना तालुक्यातील चिंचली येथे घडली आहे

उमराणी येथील रहिवाशी प्रभू  डबनवर यांनी 2017 साली जानेवारी महिन्यात चिंचणीच्या रा मगोंडा निलजगी यांची सर्वे क्र 105/2 मधील 1 एकर 14 गुंठे जमीन विकत घेतली होती. त्याप्रमाणे 40 दिवसानंतर डबनवर यांच्या नावाने सातबारा निघाला होता त्यानंतर 4 दिवसापूर्वी गोल्ड लोनसाठी सोने तारण कर्जासाठी नवा सातबारा काढल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे डब्बनवर यांच्या नावावर केवळ 7 गुंठे जागा दिसते तर उर्वरित जमीन जुने मालक निलजगी यांच्या नावावर होती.

यामुळे डब्बनवर याना मोठा धक्काच बसला त्यांनी सदर बाब भूमापन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविले पण त्याकडे दुर्लक्ष्य केल्यामुळे शेवटी सदर बाब तहसीलदार चिदंबर कुलकर्णीच्या लक्ष्यात आणून दिली  त्यांनी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे हे सर्व भूमापन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाल्याचे प्रभू डबनवर सांगितले  यापूर्वी चिकोडी परिसरात एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत यामुळे नागरिकानो चेक करा आपला सातबारा अन्यथा दुसऱ्याच्या नावावर होईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे