Mon, Apr 22, 2019 21:38होमपेज › Belgaon › ‘वडगाव’ची पाहणी

‘वडगाव’ची पाहणी

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 27 2018 12:51AMबेळगाव : प्रतिनिधी

महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीनंतर सायंकाळी अधिकार्‍यांनी वडगाव परिसराची पाहणी करून कचरा उचल वेळेत करून गटारी स्वच्छ ठेवण्याची सूचना कर्मचार्‍यांना केली. मनपा आयुक्‍त शशिधर कुरेर आरोग्य अधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा व पर्यावरण अभियंता उदयकुमार तलवार यांनी संभाजीनगर, पाटील गल्ली आदी भागाला भेट देऊन दैनंदिन स्वच्छता, केरकचर्‍याची उचल व डास निर्मूलनाची पाहणी केली.

वडगावसह  खासबाग व जुने बेळगाव येथील दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष  देऊन तेथील केरकचर्‍याची तातडीने उचल करावी, असा आदेशही कुरेर यांनी मनपाच्या स्वच्छता कंत्राटदारांना आदेश बजावला. माजी नगरसेविका प्रा. वर्षा आजरेकर यांना तेथील समस्या विचारून मनपाच्या या अधिकार्‍यांनी तातडीने त्या ठिकाणी उपाययोजना हाती घेण्याची ग्वाही दिली. 

प्रा. आजरेकर यांनी या भागातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी चिकुनगुनिया व डेंग्यू रुग्ण असल्याचे सांगून वैद्यकीय खर्च  त्यांना पेलणे कठीण असल्याचे सांगितलेे. तसेच विशेष उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी केली.  त्यावर डॉ. नाडगौडा यांनी वडगावच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा  उपचाराची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगून वेळ मारून नेली.