Tue, Nov 19, 2019 11:00होमपेज › Belgaon › शहरात शांतता राखण्यास कटिबध्द

शहरात शांतता राखण्यास कटिबध्द

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 11:17PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

यापूर्वी विजापूर, गुलबर्गा विभागात काम केले आहे. बेळगाव जिल्ह्यात काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली आहे. बेळगावात शांतता राखण्यासाठी कटिबध्द आहे. बेळगावसंबंधी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून माहिती मिळविली आहे. येथील घडामोडींची अधिक माहिती नसल्याने सविस्तर बोलू शकत नाही. शहरात कोणते नवीन उपक्रम राबवले जाणार आहेत, याची माहिती देईन, असे नूतन पोलिस आयुक्त डी. सी. राजाप्पा यांनी सांगितले. 

गुरुवारी (दि.4) सकाळी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,  सर्व माध्यम प्रतिनिधींना पुढील महिन्यात बोलावून कामाची रूपरेषा स्पष्ट करेन. प्रथम काम कायदा व सुव्यवस्था राखणे आहे. फावल्या वेळेत कविता व माझ्या कामावर पूर्ण वेळ देणारा अधिकारी आहे.  

यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाच्या उपायुक्त सीमा लाटकर यांनी राजाप्पा यांच्याकडे सूत्रे सुपूर्द केली. वाहतूक व गुन्हे विभागाचे उपायुक्त अमरनाथ रेड्डी उपस्थित होते. आयुक्तांनी शहरातील सर्व पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेतली.