Tue, Oct 22, 2019 01:32होमपेज › Belgaon › आता वाळू मिळणार बॅगमधून

आता वाळू मिळणार बॅगमधून

Published On: Dec 02 2017 12:40AM | Last Updated: Dec 01 2017 10:37PM

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी

राज्यातील वाळू टंचाईवर मात करण्यासाठी जानेवारीपासून थेट मलेशियातून वाळू आयात करण्यात येणार आहे. ही वाळू ग्राहकासाठी सिमेंटच्या धर्तीवर 50 कि. ग्रॅ. च्या बॅगेतून विक्री केली जाणार आहे. यासाठी सुमारे 175 रु. इतका दर आकारण्याची शक्यता कायदा आणि संसदीय व्यवहार मंत्री टी. बी. जयचंद्र यांनी दिली. विधानसौधमध्ये गुरुवारी याबाबत संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यातील वाळू टंचाईबाबत चर्चा करण्यात आली.

मागील काही वर्षांपासून वाळू टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे वाळू तस्करांकडून वाळूचा गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावर मात करण्यासाठी परदेशातून वाळू आयात करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू होते. त्यानुसार मलेशियातून जानेवारीपासून वाळू आयात होणार आहे.

वाळू आयात करण्याची आणि विक्रीची जबाबदारी ‘एमएसआयएल’कडे सोपविण्यात आली आहे. यासाठी राज्याच्या वाळू धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. एक टन वाळूचा दर सरासरी 3500 ते 3800 इतका आहे. दर्जानुसार वाळू 50 कि. ग्रॅ.च्या बॅगमध्ये भरण्यात येणार असून त्याची नागरिकांना मागणीनुसार विक्री होणार आहे.