Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Belgaon › प्रमुख पक्षानंतर नोटाला सर्वाधिक मते

प्रमुख पक्षानंतर नोटाला सर्वाधिक मते

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 7:54PMम्हैसूर : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षानंतर नोटाला सर्वाधिक मते मिळाली आहेत. म्हैसूर जिल्ह्यातील 11 मतदार संघामध्ये नोटाने चांगलीच मते घेतली आहेत. नंजनगुड्ड मतदार संघामध्ये सर्वात जास्त म्हणजे 1947 मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. तर सर्वात कमी म्हणजे, पेरियपाटणा मतदारसंघामध्ये 1176 नोटा मतांची नोंद झाली आहे. मुख्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या तुलनेने नोटाने चौथा क्रमांक मिळविलेला आहे. 

नंजनगुड्ड मतदार संघामध्ये तीन उमेदवारांना पडलेल्या मताच्या तुलनेने त्या मतांचा चौथा क्रमांक लागला आहे. भाजपचे उमेदवार बी. हर्षवर्धन यांना 78030, काँग्रेसचे कलाले केशवमूर्ती यांना 65,551 तर निजदचे उमेदवाराला 13,679 मते पडलेली आहेत. एच. डी. कोटे मतदार संघामध्ये 1596 नोटाला मते पडलेली आहेत. त्या मतांचा पाचवा क्रमांक लागलेला आहे. काँग्रेसच्या अनिल चिक्कमडू यांना 76652 निजदचे चिक्कण्णा यांना 54559 व भाजपचे सिद्धराजू यांना 34425 मते आणि आरपीआयचे जी. के. गोपाल यांना 1763 पडलेली आहेत. इतर तीन अपक्ष उमेदवार मतांच्या दृष्टीने खूपच पिछाडीवर आहे. 

चामराज मतदारसंघामध्ये नोटाने 1561 मते घेतलेली आहेत. त्याठिकाणी भाजपचे उमेदवार एल. नागेंद्र यांना 51683 मते काँग्रेसचे उमेदवार वासु यांना 36747 निजदचे उमेदवार के. एस. रंगाप्पा यांना 27284 आणि अपक्ष उमेदवार के. हरीशगौडा यांना 21282 मते तर आप उमेदवाराला नोटा मतापेक्षा कमी म्हणजे 483 मते मिळाली आहेत.