Fri, Jul 19, 2019 20:12



होमपेज › Belgaon › व्यक्‍तिला नाही पक्षाला महत्त्व द्या

व्यक्‍तिला नाही पक्षाला महत्त्व द्या

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 12 2018 11:38PM



खानापूर : वार्ताहर

आगामी निवडणुकीत तालुका भाजप पक्षाकडून कोण उमेदवार असेल, याची वायफळ चर्चा न करता तालुक्यात पक्षाला बळकटी प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून कार्य करा. पक्षश्रेष्ठींनी दिलेला उमेदवार हा सर्व निकष लावून ठरविलेला असतो. त्यामुळे  इच्छुकांबद्दलच्या अफवा पसरविण्याचे थांबवा. व्यक्तीला नाही तर पक्षाला महत्त्व द्या, अशी सूचना केंद्रीय कौशल्य विकास मंत्री खा.अनंतकुमार हेगडे यांनी केली.

खानापुरात तालुका भाजपच्यावतीने नवशक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील होते. यावेळी शरद केशकामत आणि काही ग्रा.पं.सदस्यांनी पक्षप्रवेश  केला. बाबुराव देसाई यांनी स्वागत  तर प्रास्ताविक तालुका प्रभारी संतोष लाड व आ. महांतेश कवटगीमठ यांनी केले.

यावेळी लाड म्हणाले, तालुक्यातील बुथ कमिट्या सक्षम झाल्या पाहिजे. एका बुथवर एक अध्यक्ष आणि 11 सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्वांनी मिळून बुथवर भाजपचे मतदार कसे वाढतील, यासाठी झटले पाहिजे. बुथवर विजय झाल्यास तालुक्यात भाजपची सत्ता येईल.

सध्याच्या विज्ञान युगात सोशल मीडियाला महत्त्व आले आहे. त्यामुळे इच्छुकांसह कार्यकर्त्यांनी तसेच मोर्चाच्या अध्यक्ष, सदस्यांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा, असे मत धनंजय जाधव यांनी मांडले. आगामी निवडणुकांत गुजरात पॅटर्न वापरण्यात येणार असून पेज प्रमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पी. भावेश यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, संजय कुबल, सुभाष गणुळशेट्टी, राजेंद्र पवार, बाबान्ना पाटील, मंजुळा कापसे,  विठ्ठल हलगेकर, सरेश देसाई,  राज्य महिला मोर्चाच्या सेक्रेटरी धनश्री सरदेसाई, मल्लाप्पा मारिहाळ, मारुती पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.