Fri, Apr 26, 2019 09:24होमपेज › Belgaon › भाजपच्या दिमतीला उत्तर भारतीय नेते

भाजपच्या दिमतीला उत्तर भारतीय नेते

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 11:40PMबेळगाव : प्रतिनिधी       

ईशान्य राज्यातील भरघोस यशानंतर अधिक जोमाने कार्याला लागलेल्या भारतीय जनता पक्षाने राज्यात आगामी आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर भारतीय नेतेमंडळींना निमंत्रित करण्याचे ठरविले आहे. गुजरात व उत्तर प्रदेशातील भाजपचे काही दिग्गज नेते लवकरच राज्याच्या दौर्‍यावर येणार आहेत.

राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या सूचनेवरून राज्याच्या प्रत्येक 4 विधाससभा मतदारसंघांसाठी एक राष्ट्रीय पातळीवरील  नेता याप्रमाणे 56 प्रभावी नेत्यांना नेमण्यात आले आहे. राज्यात एकूण 224 विधानसभा मतदारसंघ असून दिग्गज नेत्यांची निवड करण्यात आली आहे. या नेत्यांच्या नावांची यादी राज्यातील भाजपच्या पदाधिकार्‍यांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आली आहे. 

नेत्यांच्या दौर्‍याची देखभाल घेण्यासाठी राज्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे टूर इन्चार्ज नेमण्यात आले आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी ईरण्णा कडाडी यांची नेमणूक करण्यात आली आहे. नेतेमंडळी आपल्यावर सोपविण्यात आलेल्या मतदारसंघात दौरा करून तेथील पक्ष कार्यकर्त्यांच्या कामाचे निरीक्षण करून आवश्यक त्या सूचना देतील. 

राज्यात यापूर्वी निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय नेते आले तरी जाहीर सभा घेऊन निघून गेले. यंदा निवडणुकीच्या निमित्ताने येणारे राष्ट्रीय पातळीवरील नेतेमंडळी   सोपविण्यात आलेल्या मतदारसंघांची जबाबदारी निवडणूक होईपर्यंत सांभाळणार आहेत. नेत्यांच्या राज्य दौर्‍याची तारीख अद्याप निश्‍चित करण्यात आलेली नाही. टूर इन्चार्ज हे नेतेमंडळींशी चर्चा करून दौर्‍याची तारीख निश्‍चित करतील. 

गुजरातचे खासदार बेळगावात  निरीक्षक

भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा यांच्या शिकारीपूरसह चार मतदारसंघासाठी उत्तर प्रदेशचे खासदार केद्रीयमंत्री मनोजकुमार सिन्हा, कारवार जिल्ह्यासाठी मध्यप्रदेशचे खा.वीरेंद्रकुमार व गुजरातचे खा. देवूसिन्हा चौहान तसेच 18 विधानसभा मतदारसंघ असलेल्या बेळगाव जिल्ह्यासाठी गुजरातमधील केंद्रीयमंत्री व खासदारांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.