Wed, Apr 24, 2019 21:35होमपेज › Belgaon › पेट्रोलपंप आगीचे कारण गुलदस्त्यातच

पेट्रोलपंप आगीचे कारण गुलदस्त्यातच

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 7:47PMबेळगाव : प्रतिनिधी

आयनॉक्ससमोर असलेल्या  अशोक पेट्रोल स्टोर पेट्रोल पंपाला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. तातडीने आग विझविण्यासाठी कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. इंडियन ऑईल कंपनीचे अधिकारी पंपाची पाहणी करणार असून नंतर अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली.अचानक पेट्रोल पंपाला आग लागल्याची बेळगावातील ही पहिली घटना आहे. यापूर्वी देसूर येथील पेट्रोल पंपावर असलेल्या ट्रेनच्या डब्याना आग लागली होती. पेट्रोल पंप आगीची माहिती अग्निशमन दल व पोलिस खात्याला न दिल्याने आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.