Sun, Mar 24, 2019 17:16होमपेज › Belgaon › विकासकामात आघाडी तरीही पिछाडी

विकासकामात आघाडी तरीही पिछाडी

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 24 2018 7:59PMबेळगाव : वॉर्ड  6 मध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली आहेत. आतापर्यंत सुमारे 11 कोटीची कामे वॉर्डात राबविण्यात आली आहेत. काळा तलाव, समृध्दी कॉलनी गार्डनचा विकास झाल्यामुळे वॉर्डाच्या वैभवात भर पडली आहे. मात्र अजूनही संपूर्ण नागरी समस्या निकालात काढण्यात प्रशासनाची पिछाडी झाली आहे.

वॉर्डातील नागरिक आक्रमक म्हणून ओळखले जातात. नागरी समस्या निवारण्यासाठी नगसेवकाबरोबर महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला आहे. अन्यायाविरुध्द लढा देण्यासाठी उपोषणाचे हत्यारदेखील उपसण्यात नागरिक कमी पडले नाहीत. त्यामुळे विकासकामात हा वॉर्ड आघाडीवर आहे. जागरुक नागरिक व आक्रमक नेतृत्व यामुळे नागरी समस्यांवर मात झाली आहे. अजूनही थोड्या फार समस्या आहेत त्या पावसाळ्यानंतर निकालात काढण्यात येणार आहेत. 

असा आहे वॉर्ड

जेरे गल्ली, कनकदास कॉलनी, महावीरनगर, कोनवाळ, आंबेडकर गल्ली, संत मीरा स्कूल रोड, बुडा कॉलनी, कुरबर गल्ली, वड्डर गल्ली, बजंत्री गल्ली, एस. व्ही. रोड, इंदिरानगर, सह्याद्री कॉलनी, साईश्रध्दा कॉलनी, समृध्दी कॉलनी, पारिजात कॉलनी, धर्मवीर संभाजी स्कूल मेन 
रोड ते शिवशक्तीनगर.

नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी विकासाची कास धरली आहे. विकासकामे व नागरी समस्या निकालात काढण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरले आहेत. कचर्‍याची उचल करण्यासाठी प्रयत्न, गणेशोत्सव काळात फिरते निर्माल्यकुंड निर्माण केले आहे. आतापयर्र्त 11 कोटीची कामे राबविली असून पावसाळ्यानंतर पुन्हा कामांना चालना देण्यात येणार आहे. दीपावलीच्या शुभेच्छा देताना वॉर्डात राबवलेली विकासकामे, केलेली आंदोलने याची छायाचित्रासह प्रसिध्दी दिली. त्याला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. अजून समस्या किती आहेत, याची यादी नागरिकांनीच तयार करुन नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

विकासकामाचा आलेख

अनगोळ मेन ड्रेनेज लाईन ते मारुती गल्ली बळ्ळारी नाला : 2 कोटी 18 लाख

काळा तलाव : एक कोटी

वडगाव क्रॉस ते कनकदास कॉलनी जलवाहिनी : 41 लाख

आंबेडकरनगर कनकदास कॉलनी ते कोनवाळ जलवाहिनी : 55 लाख

जेरे गल्ली जलवाहिनी : 30 लाख

आंबेडकर गल्ली सीसीरोड : 38 लाख

कुरबुर गल्ली गटार : 10 लाख

समृध्दी कॉलनीतील गार्डन  : 35 लाख

एस. व्ही. रोड : 1 लाख

आंबेडकर तलाव : 53 लाख

संत मीरा स्कूल सीसी रोड : 53 लाख

शिवशक्तीनगर, पालखी रोड : 8 लाख

श्रध्दा कॉलनी : 33 लाख

साई गार्डन : 4 लाख 25 हजार

पारिजात कॉलनी : 3.5 लाख