Tue, Apr 23, 2019 01:52होमपेज › Belgaon › यमगर्णीनजीक बस कलंडली; ४० जखमी

यमगर्णीनजीक बस कलंडली; ४० जखमी

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 27 2017 12:03AM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

गडहिंग्लजहून  कोल्हापूरकडे भरधाव  निघालेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची  बस  यमगर्णीजवळ  वेदगंगा नदी पुलानजीक रस्त्याच्या भराववरून नदीकाठावर कलंडल्याने झालेल्या अपघातात 15 प्रवासी गंभीर, तर 40 जण किरकोळ जखमी झाले.  सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास हा अपघात घडला.  गडहिंग्लज आगाराची विनाथांबा  बस (एमएच 14-बीटी 3393) मंगळवारी सायंकाळी 7.30 वा. गडहिंग्लजहून निघाली. शिवाजी रावण हे  बस  चालवत  होते. वेदगंगा नदीजवळ  चालकाचा  बसवरील ताबा सुटल्याने  भराववरून बस नदीकाठावर कलंडली. बस आणखी 50 फूट पुढे गेली असती, तर  नदीमध्ये कोसळली असती. 

वैजनाथ एकनाथ ढाळे (वय 34),  एकनाथ भरमा ढाळे (38), किरण ढाळे  (32), वृषाली गणपत ढाळे  (20), कोमल ढाळे  (वय 20, सर्व जण रा. नाशिक), संदीप वैजनाथ चिंचणकर  (32, रा. चंदगड), विजय सूरज पाटील  (40, रा. कराड), सूरज पाटील  (59, रा. कराड), राधाकृष्ण मुरकट्टी (58, रा. कोल्हापूर), दीपक वाडकर  (51, कोल्हापूर), ईश्‍वर  (58, रा. कराड) या जखमींपैकी कोमल व वृषाली यांनी गंभीर दुखापत झालेली आहे. जखमींना म. गांधी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.