Sat, Aug 17, 2019 16:52होमपेज › Belgaon › पाण्याच्या ट्रॅक्टर टँकरखाली सापडल्याने निपाणीत मुलगा ठार

पाण्याच्या ट्रॅक्टर टँकरखाली सापडल्याने निपाणीत मुलगा ठार

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 22 2018 1:25AMनिपाणी : प्रतिनिधी

शहराबाहेरील तहसिलदार प्लॉट येथे पाण्याचा टँकर मागे घेत असताना त्याखाली सापडल्याने 12 वर्षाचा मुलगा   जागीच ठार झाला.विशाल आनंदा डाफळे (वय 13 ) असे त्याचे नाव आहे.हा अपघात रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घडला. वाजता घडली. घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. तर यावेळी डाफळे परिवाराने केलेला आक्रोश पाहुन उपस्थितांचे मन हेलावले. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, तहसिलदार प्लॉट येथील सिध्दीविनायक मंदिरात रविवारी गणेश जयंतीनिमीत्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. याकरीता शहरातील पाणी पुरवठा करणारा खाजगी पाणी टँकर मागविण्यात आला होता.

महाप्रसादानंतर उरलेले पाणी डाफळे परिवार घरात भरत होते. यावेळी  विशाल हा  तेथे थांबला होता. यावेळी ट्रॅक्टर पाठीमागे घेत असताना पाठीमागील पाण्याच्या टँकरखाली विशाल आल्याने विशालच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशालला ताबडतोड महात्मा गांधी रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी वेद्यकिय अधिकार्‍यांनी विशाल मृत झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी फौजदार निंगणगोंडा पाटील, हावलदार एस. एस. चिकोडी, बसवराज नावी यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

दरम्यान घटनेची माहिती  घटना समजताच नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई-सरकार, नगरसेवक धनाजी निर्मळे तसेच परिसरातील नागरीकांनी महात्मा गांधी रूग्णालयात गर्दी केली होती. मयत विशाल हा येथील मराठा मंडळ हायस्कूल येथे 6 वी वर्गात शिकत होता. विशाल हा एकुलता एक होता.  त्यांच्या पश्‍चात आई, वडिल, दोन बहिणी आजा, आजी, काका , काकी असा परिवार आहे. याप्रकरणी आनंदा डाफळे यांनी निपाणी शहर पोलीसात फिर्याद दिली असून पुढील तपास फौजदार पाटील यांनी चालविला आहे.