Tue, Jun 18, 2019 20:18होमपेज › Belgaon › संकेश्‍वरनजीक ट्रक ट्रेलरने एकाला उडविले

संकेश्‍वरनजीक ट्रक ट्रेलरने एकाला उडविले

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 21 2018 11:34PMनिपाणी : प्रतिनिधी

पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संकेश्‍वर हद्दीतील शंकरलिंग मठाजवळ भरधाव ट्रक ट्रेलर वाहनाने एकाला उडविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्‍तीच्या अंगावर निळ्या रंगाचा शर्ट, खाकी फुल पँट असा पेहराव असून संकेश्‍वर पोलिस तपास करीत आहेत. रविवारी सायंकाळी 7 च्या सुमारास 40 ते 45 वर्षीय अज्ञात एक व्यक्‍ती रस्त्याने बेळगावच्या दिशेने चालत निघाली होती. शंकरलिंग मठासमोर जात असलेल्या सदर व्यक्‍तीला पुण्याहून बंगळुरकडे निघालेल्या ट्रक ट्रेलरने जोराची धडक दिली.

या धडकेत अज्ञाताचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान धडक बसताच ट्रक ट्रेलर मुख्य रस्त्यातच थांबल्याने बेळगावकडे जाणारी वाहतूक तब्बल  तासभर खोळंबली. दरम्यान घटनास्थळी पुंज लॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक एम. आर. घाटगे, आणापा खराडे, कर्मचारी शशिकांत गडकरी, गजानन मुगळी यांच्यासह कंपनी अ‍ॅम्ब्युलन्सचे डॉ. संतोष कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करून दिली. रात्री उशिरापर्यंत मृत व्यक्‍तीची ओळख पटली नव्हती. घटनास्थळी मृत व्यक्‍ती वेडसर असावी, अशी चर्चा सुरू  होती.