Sat, Nov 17, 2018 20:32होमपेज › Belgaon › ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 1:34AM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदीघाट उतारावरील हॉटेल अमरसमोर तामिळनाडूहून मुंबईकडे जाणार्‍या ट्रकने दुचाकीस्वारला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बाबू दत्तू जाधव (वय 55, रा. प्रभूवाडी, चिकोडी, रामनगर) असे मृताचे नाव आहे. अपघात सोमवारी सायंकाळी 7 च्या सुमारास झाला. 

बाबू  दुचाकीवरून तवंदीहून प्रभूवाडीकडे निघाले असताना मागून येणार्‍या ट्रकने  दुचाकीला  धडक बसली. त्यामुळे ते दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली  सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  घटनास्थळी पुंज लॉईड भरारी पथकाचे निरीक्षक अण्णाप्पा खराडे यांच्यासह फौजदार शशिकांत वर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.  जाधव यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.